भद्रावती : जयपूर येथे पार पडलेल्या फॉर एव्हर स्टार इंडिया-२०२२ सौंदर्य स्पर्धेत भाग्यश्री तामगाडगे ही महाराष्ट्रातून दुसरी मिस महाराष्ट्र ठरली.भाग्यश्री हिने आपल्या जिल्ह्याचे नाव उंचाविले.त्याबद्दल तिचे सर्वस्तरातून अभिनंदन केल्या जात आहे.
या स्पर्धेत देशभरातून ६० स्पर्धकांनी भाग घेतला.ही स्पर्धा मॉडेलिंग साठी असलेल्या मिस कॅटेगरी करिता होती.यात महाराष्ट्रातून सहभागी झालेल्या स्पर्धेत सातारा, चंद्रपूर,मुंबई,येथील स्पर्धक विजेत्या ठरल्या असून त्यांची राष्ट्रीय पातळीवर निवड झाली आहे.येथील भाग्यश्री सतीश तामगाडगे हिने मिस महाराष्ट्र – रान अप म्हणून महाराष्ट्रातून द्वितीय क्रमांक मिळविला.या स्पर्धेचे आयोजक राजेश अग्रवाल ,साक्षी शेखर,सलोनी गुर्सेन आणि मार्गदर्शक शैलजा सुरी होत्या.एव्हढ्या लहान शहरातील युवतीने देशपातळीवर सौंदर्य स्पर्धेत मिळविलेल्या यशाबद्दल तिचे अभिनंदन होत आहे.