वरोरा :- 2 ऑक्टोबर गांधी जयंती व लालबहाद्दूर शास्त्री जयंती च्या निमित्ताने आनंदनिकेतन महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने श्रमदान व स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरवात महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. महाविद्यालयाचे प्राचार्य .डॉ.मृणाल काळे यांनी या प्रसंगी विद्यार्थ्यांना स्वच्छते संदर्भात शपथ दिली आणि श्रमदाना चे महत्व उपस्थित सर्व राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांना पटवून दिले. महात्मा गांधींजींची श्रम प्रतिष्ठा यावरही त्यांनी या प्रसंगी भाष्य केले.
विद्यार्थ्यांनी फक्त जयंती पुरते महापुरुषांचे पूजन करू नये तर त्यांचे विचार कायमच आत्मसात केले पाहिजे असे मत कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्य प्रा.राधा सवाने यांनी मांडले. ‘श्रम ही है श्रीराम हमारा’ हे श्रद्धेय बाबा आमटे व आनंदवनाचे ब्रीद वाक्य आणि ह्याला अनुसरूनच आजच्या श्रमदानात उत्साहाने सहभागी होण्याचे आवाहन रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा.मोक्षदा नाईक यांनी आपल्या प्रास्ताविकेतून केले. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे या उपक्रमात सहभाग नोंदवला.या श्रमदानातून व स्वच्छता अभियानातून प्लॅस्टिक गोळा करण्याचे काम ही विद्यार्थ्यांनी केले.विभागीय समन्वय प्रा.डॉ.रंजना लाड, कार्यक्रम अधिकारी प्रा. मोक्षदा नाईक व प्रा.सुरेश राठोड, प्रा.मारोती मुंढे आणि या कार्यक्रमाला उपस्थित महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग यांच्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात श्रमदान व स्वच्छता केली.