गोंडपिपरी(सुरज माडुरवार- . उपसंपादक ) लिखितवाडा-वढोली मार्गावर पुलाचे बांधकाम सुरू असून शेतकऱ्यांना,प्रवास करणाऱ्या नागरिकांना पर्यायी व्यवस्था म्हणून डायवरशन काम करणे कंत्राटदाराला अनिवार्य असते.तशी निधी देखील मिळते संततधार पावसामुळे पुरपरस्थितीमुळे लिखितवाडा नाल्याच्या पाण्याच्या पातळीत मोठी वाढ होऊन आहे.पर्यायी बनवलेला रपटा वाहून गेल्याने वढोली येथील शंभर शेतकऱ्यांची शेती पंधरा दिवसांपासून संकटात आली असून एक किलोमीटर चे शेत गाठायचे असल्यास १० किलोमीटर बोरगाव,वडकुली मार्गे प्रवास करून शेत गाठावे लागत असल्याने वढोली येथील शेतकरी चिंतेत सापडला आहे
काहींनी तर गेल्या पंधरा दिवसांपासून आपल्या शेतात पाय देखील ठेवला नाही शेती उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे.लिखितवाडा – वढोली मार्गावर तात्काळ रपटा बनवुन किव्हा पुलाचा मार्ग सुरू करून घ्यावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.दि.२२ शुक्रवारी प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शेतकऱ्यांनी निदर्शने केली.आज दि.२५ (सोमवार) गोंडपीपरिचे तहसीलदार के.डी मेश्राम यांनी लिखितवाडा पुलाच्या मार्गाची पाहणी करून ५ दिवसात पुलावरील वाहतूक किव्हा पर्यायी व्यवस्था म्हणून रपटा बनवून द्यावा असे निर्देश बांधकाम विभागाला व कंत्राटदाराला दिले.सोबतच महावितरणच्या अधिकाऱ्यांशी बोलून पुलावरील स्ट्रिट लाईन हटवन्याच्या सूचनाही दिल्या.