चिमुर :- तालुक्यातील साठगाव येथील भिवापूर रस्ताची गिट्टी उखडल्याने हा रस्ता अपघाताला निमंत्रणदेत आहे . साठगाव हे गाव चंद्रपूर नागपूर व भंडारा जिल्ह्याच्या सीमेवर बसलेल आहे त्यामुळे या गावावरून भंडारा ,नागपूर व चंद्रपूर जाणारे मार्ग तयार करण्यात आलेल्या चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेमध्ये येत असलेल्या साठगाव ते भिवापूर हा जवळपास दहा किलोमीटरचा रस्ता अतिशय खराब झाला असून जागोजागी खड्डे पडलेले आहेत या खड्ड्यामुळे प्रवास करणाऱ्या वाहनांना छोटे-मोठे अपघात झालेले आहे .साठगाव वरून भिवापूर हे 15 किलोमीटर तालुक्याचे ठिकाण असल्याने साठगाव हिवरा व कोलारी येथील जनता या मार्गाने नियमित प्रवास करीत असतात नागपूर जिल्ह्याच्या हद्दीतील पाच किलोमीटर रस्ता अतिशय चांगल्या प्रमाणात आहे परंतु चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या हा दहा किलोमीटरचा रस्ता अतिशय खराब झाला असल्याने वाहनधारकांना वाहन चालवणे कठीण झाले आहे या संदर्भात वारंवार आमदार, जिल्हा परिषद सदस्य तथा संबंधित विभागाला विनंती अर्ज सादर करूनी अजूनही या रस्त्याचे बांधकाम झालेले नाही त्यामुळे या रस्त्याचे बांधकाम लवकरात लवकर करावे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे .