चंद्रपूर :- डॉक्टरांच्या निष्काळजीमुळे एका दोन वर्षीय बालकांचा गडचिरोलीच्या महीला रूग्णालयात मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली पार्थ आशीष प्रधाने २ वर्ष असे मृत बालकाचे नाव असून तो सावली येथील रहिवाशी होता. १३ जुलैला अचानक दोन वर्षीय पार्थ ची प्रकृति बिघडल्याने त्याला उपचारार्थ गडचिरोली येथील महिला रुग्णालयात भर्ती करण्यात आले. परिणामी प्रकृति खालावत असतांना तीन तास होउनही कर्तव्यावर असलेल्या डॉक्टरानी साधी पाहणी केली नाही. परिणामी दोन वर्षीय बालकांचा मृत्यु झाला.
डॉक्टरच्या निष्काळजी पणामुळे दोन वर्षीय बालकाला आपला जीव गमवावा लागल्याने पालकांसह परिवारातील लोकांनी कर्तव्यावर कसूर करणाऱ्या डॉक्टरांवर गुन्हा दाखल करून निलंबीत करावे अशी मागणी केली आहे.
चंद्रपूर जिल्हयातील सावली येथील पार्थ आशिष प्रधाने या २ वर्षीय बालकाला त्याच्या कुटुंबीयांनी पहाटे ४.०० वाजता उपचारासाठी गडचिरोली येथील महिला रूग्णालयात दाखल केले. परंतु यावेळी एकही डॉक्टर हजर नव्हते. डॉक्टर तारकेश्वर उईके यांची नेमणूक असतांना ते ड्युटीवर हजर नव्हते. वारंवार फोन करूनही डॉक्टर आले नाही.
डॉक्टर उईके सकाळी ७. ४५ वाजता आले. तोपर्यंत बालकाचा मृत्यू झाला होता . या प्रकरणात मृतकांच्या कुटुंबीयांनी जिल्हा शल्य चिकित्सक व पोलीस स्टेशन गडचिरोली येथे तक्रार नोंदविली त्यानूसार चौकशी सुरू केली व मृतकाचे शव पोस्टमार्टमसाठी पाठविले घटनेचे गांभीर्य लक्ष्यात घेत . खासदार अशोक नेते यांनी परिवाराचे सांत्वना करीत सदर डॉक्टरावर कार्यवाही केली जाईल. अशी ग्वाही परिवारातील लोकांना दिली. सोबतच महिला रुग्णालयातील सर्व डाक्टरांची बैठक घेऊन तसेच जिल्हाधिकारी संजय मीना यांच्या सोबत बैठक करुण सदर डॉक्टरवर कार्यवाही करण्यात यावी. अशी मागणी खासदरानी केली. त्यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष अविनाश पाल, तालुका महामंत्री तथा नगरसेवक सतीश बोम्मावार, श्याम हटवादे निखिल सुरमवार, मनोज अमराजवार चंद्रकांत प्रधाने, यावेळी उपस्थित होते.