कोरची :- मागील काही दिवसांपासून कोरची शहरामध्ये माकडांचा धुमाकूळ सुरू असून अनेक नागरिकांचे नुकसान झाले आहे. कोरची शहरातील २,३,४,५, क्रमांकाच्या वर्डामध्ये माकडांनी धुमाकूळ घातला असून या वार्डामधील पेरूच्या झाडावरील पेरू खाण्यासाठी, शेवग्याच्या झाडावरील शेवगा शेंगा खाण्यासाठी माकड येत आहेत. आणि अशा फळं झाडे असलेल्या परिसरात माकडांनी जास्त उत्पात घातला आहे.
या उत्पाती मध्ये या वार्डातील काही नागरिकांच्या घरावरील कवेलू व सिमेंट सेड फुटले व नुकसान झाले आहेत. सध्या पावसाळा सुरू असल्याने पावसाचे पाणी आत मध्ये शिरून सामान ओले झाले आहे. यापूर्वी सुध्दा अनेकदा माकडांनी नुकसान केले आहे. तसेच यावेळी मागील काही दिवसांपासून सकाळ,दुपार, संध्याकाळ माकडे हाकलण्याचे ड्युटी काही नागरिकांची झाली आहे. या नागरिकांना घरातील दुकानातील कामे सोडून माकड हाकलावे लागत असल्याने त्रास होत आहे.
काही नागरिक फटाके फोडून तर काही नागरिक काठ्यानी, दगळ मारून हाकलित आहेत. परंतु निडर माकडं थोड्या वेळापूर्ती पळतात आणि पुन्हा येतात त्यामुळे कोरची शहरातील नागरिकांची डोके दुखी वाढली असून स्थानिक प्रशासनाने व वनविभागाने या माकडांची विल्हेवाट लवकरात लवकर लावण्याची मागणी कोरची शहरातील नागरिकांकडून केली जात आहे.
याबाबद बेडगाव वनविभागातील वनपरिक्षेत्र अधिकारी एल एम ठाकरे यांना विचारणा केली तर त्यांनी सांगितले की बहुतांश माकडं ही उन्हाळ्यात पाणी पिण्यासाठी शहरात येत असतात परंतु ही माकडे येण्याचं काय कारण आहे ते शोधून लवकरच या माकडांचे बंदोबस्त करणार असल्याची माहिती दिली आहे.