भद्रावती: तालुक्यातील वायगाव तु. शाळेच्या विद्यार्थ्यांना ऊर्जा सोशल अँड कल्चरल फाउंडेशन चंद्रपूर च्या वतीने स्कूल बॅगचे वितरण करण्यात आले.
औष्णिक विद्युत केंद्र चंद्रपूर येथील कार्यरत अभियंता मित्रांनी सामाजिक कार्याच्या हेतूने फौंडेशन स्थापन करून ते दरवर्षी गरीब व होतकरु विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी शैक्षणिक वस्तू भेट देतात. याच अनुषंगाने ऊर्जा फाउंडेशन चे अध्यक्ष अभियंता राजकुमार गिमेकर आणि अभियंता पारस कांबळे, मोहन वैद्य, जगदेव सपकाळ, सुशिल ठावरी या सदस्यांनी सदर कार्यक्रमाचे आयोजन वायगाव येथील गुरुदेव सेवा मंडळाच्या प्रार्थना मंदिरात करून त्यांनी जिल्हापरिषद उच्च प्राथमिक शाळा वायगाव तुकुम च्या विद्यार्थ्यांना स्कूलबॅगचे वितरण करून बालकांच्या चेहऱ्यावर उत्साह व आनंदाची निर्मिती करून हसू फुलविले.
याप्रसंगी सरपंच भावना कुरेकार, शा. व्य. स. च्या अध्यक्ष नीलिमा कुरेकार, मुख्याध्यापक गजानन घुमे, उपसरपंच विनोद मडावी, शा. व्य. स. चे सदस्य बालाजी घोडमारे, भाग्यश्री डाखोरे, सारिका भुसारी, माधुरी टोंगे, गुरुदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष गुलाबराव भडके, सचिव योगेश्वर कुरेकार,तं. मु. स. चे अध्यक्ष पांडुरंग कुरेकार, प्रतिष्ठित नागरिकचांगदेव दिवसे, अरविंद कोहळे, साधुजी मोहितकर, जनार्दन नन्नावरेव पालकवर्ग यांचे उपस्थितीत मान्यवरांचे शुभहस्ते स्कूल बॅगचे वितरण करण्यात आले.
उपस्थितांना मार्गदर्शन अभियंता पारस कांबळे यांनी केले,सूत्रसंचालन मीनाक्षी बलकी, प्रास्ताविक मु. अ. गजानन घुमे तर आभारप्रदर्शन महेश सोरते यांनी केले. कार्यक्रमाचे यशस्वितेकरिता विलास कुलमेथे,विलास बतकी, केशव बोन्डे, कविता हनवते यांनी परिश्रम घेतले.