वरोरा :- दि. २ मे पासून सुरु झालेल्या उन्हाळी सुट्यांमधील स्पोकन इंग्रजी वर्गाचा आज तब्बल ४० व्या दिवसा नंतर दि. २५ जून रोजी सकाळी ९-०० वाजता जि. प. उ. प्राथमिक शाळा साखरा राजा इथे एका अत्यंत साध्या पद्धतीने निरोप समारंभ साजरा करण्यात आला .
या वेळी शाळेच्या मुख्याध्यापिका भारती बतकी , गो विथ् स्ट्रकचर या यु-ट्यूब चॕनेलचे निखिल ताठे , राज गुडधे , आकाश राऊत , प्रजय धोटे व विनित बोबडे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते . या उन्हाळी वर्गात या चॕनेल द्वारे आपल्या विद्यार्थ्यांचे व्हिडीओ चित्रीत करण्यात येवून त्या माध्यमातून हा उपक्रम महाराष्ट्राच्या तमाम मराठी माध्यमांच्या मराठी शाळांमध्ये शिकणा-या मुलांना उपलब्ध करुन देण्यात आला . यापुढेही या चॕनेलवर या विद्यार्थ्यांचे नवनविन व्हिडीओ चित्रीत करुन अप् लोड केल्या जातील असे चॕनेल चे निखिल ताठे यांनी आपल्या मनोगतात सांगितले . ते पुढे म्हणाले की हा उपक्रम निश्चितच मराठी माध्यमांच्या विद्यार्थ्यांच्या स्पोकन इंग्रजीच्या दृष्टीने अत्यंत उपयोगी ठरेल यात शंकाच नाही . शाळेच्या मुख्याध्यापिका बतकी यांनी उन्हाळी सुटीचा सदुपयोग केल्याबद्दल वर्गातील सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले .
या स्पोकन इंग्रजी वर्गास दि. २५ मे ते ३ जुन पर्यंत सुट्या देण्यात आल्या होत्या . रविवार व या सुट्या वगळता हा वर्ग निरंतर ४० दिवस उन्हाळी सुट्यांमध्ये घेण्यात आला . या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा भरपूर प्रतिसाद मिळाला व त्याचे अतिशय चांगले रिझल्ट मिळाले . या वर्गात विद्यार्थ्यांकडून एकूण एक्कोणनव्वद इंग्रजी वाक्यरचनांवर काम करण्यात आले ज्यामध्ये काळाशी संबधित १२ वाक्यरचना , याच १२ वाक्यरचनांमधल्या ९ स्ट्रकरचा उपयोग करुन ५४ सकारात्मक , नकारात्मक , ईन्ट्रोगेटीव्ह व डब्लू एच प्रश्नांचे स्ट्रकचर , त्यावरील इंग्रजी वाक्ये व त्या वाक्यांचे मराठी भाषांतर त्याचप्रमाणे २३ आॕक्झिलरी क्रियापदांच्या वाक्यरचनांवरही काम करण्यात आले . या वर्गाचे काही लाईव्ह व्हिडीओ गो विथ स्ट्रकचर या यु ट्यूब चॕनेलवर उपलब्ध आहे . या जि. प. विद्यार्थ्यांनी जेव्हा स्वतःला यु ट्यूबवर पाहिले तेव्हा त्यांचा व त्यांच्या पालकांचा आनंद गगनात मावेनासा झाला . या विद्यार्थ्यांनी यापुढेही अशाचप्रकारे यु ट्यूब च्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या तमाम मराठी माध्यमांच्या विद्यार्थ्यांपर्यंत असेच नवानविन व्हिडीओज घेवून येण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे ठरविले आहे . या विद्यार्थ्यांची इंग्रजी विषयात तयार झालेली रुची पाहून गोपाळ गुडधे सरांनी व या विद्यार्थ्यांनी गो विथ स्ट्रकचर च्या टीम सोबत या पुढेही हा उपक्रम निरंतर सुरु ठेवून महाराष्टातल्या तमाम मराठी माध्यमांच्या मुलांना स्पोकन इंग्रजी व्हिडीओ पुरविण्याचे ठरविले आहे . या उपक्रमात सहभागी सर्व विद्यार्थ्यांचे व गो विथ स्ट्रकचर टीम चे गोपाळ गुडधे यांनी मनापासून आभार व्यक्त केले आहे .