भद्रावती : समाजसेवेचे व्रत घेवून सुरू असलेला स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरिअल रवि शिंदे चॅरीटेबल ट्रस्टचा प्रवास अविरत सुरू आहे. शेतकरी, शेतमजूर, गरीब, गरजू, अपघातग्रस्त, दुर्धर आजाराने ग्रस्त तथा रुग्ण जनतेला सढळ हाताने मदत करण्याचे सत्र राबवित सामाजिक कार्याचा आदर्श समाजापुढे ठेवण्याचा मानस ट्रस्टचा आहे. एखाद्याला थोडी फार मदत करून आपण त्याची संपूर्ण जवाबदारी घेतो असे नसते किंवा त्याची गरज संपते असेही नाही मात्र काळ सोकावला जावू नये, ही भूमिका ट्रस्टची असल्याचे रवि शिंदे यांनी म्हटले.
स्थानिक शिवाजी नगर येथील रहिवासी सुधीर सुरेश चव्हाण हे कॅन्सर आजाराने ग्रस्त आहे. त्यांना आज (दि.२५) ला आर्थिक मदत करण्यात आली. यावेळी त्यांची पत्नी माधुरी सुधीर चव्हाण उपस्थित होत्या.
समाजात अनेक नागरीक हे मदतीपासून वंचित असतात. छोट्या छोट्या बाबींसाठी अडचणी निर्माण होतात. योग्य वेळी योग्य साथ मिळत नाही. अशा वेळी स्थानिक स्तरावर दाते असल्यास हिंमत व उमेद तयार होते. समाजात हा संदेश ट्रस्टच्या माध्यमातून पोहोचावा, करीता ट्रस्टचे कार्य अविरत सुरु आहे.
यापूर्वीपासून अनेक शेतकरी, शेतमजूर, गोरगरीब, गरजुंसाठी मदतकार्य सुरु आहे. अपघातग्रस्त व रुग्णांना वेळोवेळी मदत केल्या जात आहे. याचा परिणाम असा की अल्पावधीत ट्रस्ट ही घरोघरी पोहोचली. अनेक गरजू ट्रस्ट कडे संपर्क साधतात. व तेव्हढ्याच उत्स्फूर्तपणे ट्रस्ट मदतकार्य राबवित असते.
याप्रसंगी रोहण कुटेमाटे, विश्वास कोंगरे, ज्ञानेश्वर डुकरे, रुपेश पचारे, आदी उपस्थित होते.