कोरची:- दरवर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीला कोरची तालुक्यातील जांभूळ निघण्यास सुरुवात होतो ही जांभूळ चंद्रपूर आणि नागपूरसारख्या मोठ्या शहराच्या ठिकाणी विकण्यासाठी नेली जातो तेथील विक्रेते ग्राहकांना कोरचीचे जांभूळ सांगितले की पहिली आवडीची जांभूळ म्हणून मोठ्या प्रमाणात नागरिक पसंत करून विकत घेतात.
नागपूर,चंद्रपूर या शहरांमध्ये दरवर्षी मध्यप्रदेशातील मंडला,छत्तीसगड मधील पाखाकांजुर आणि उडीसा मधील जांभुळ सुद्धा विक्रीसाठी येतो परंतु या तिन्ही ठिकाणच्या जांभळीपेक्षा गडचिरोली जिल्ह्यातील कोरचीच्या जांभळीला लोकांची अधिक पसंती असून मोठ्या प्रमाणात विकली जाते . त्यामुळे तालुक्यातील बहुतेक लोकांना रोजगाराची संधी मिळते आणि महिनाभर सुरू असलेल्या जांभूळ खरेदी विक्रीमधून बऱ्यापैकी नफा मिळत असतो .
तसेच छोट्या व्यापारी लोकांना कमी वेळात अधिकचा नफा मिळविण्याची ही चांगली संधी असते. पूर्वी तालुक्यातील ग्रामीण भागातील बहुतेक शेतकरी जांभुळ संकलन करून विकायला डोक्यावर टोपली घेवून व सायकलवर मांडून कोरची शहरात आणायचे परंतु मागणी वाढल्याने स्थानिक व्यापारी आणि मोठ्या शहरातील व्यापारी ज्या ठिकाणी जांभळीचे झाडे आहेत अशा ठिकाणी जाऊन त्या लोकांकडून व मालकाकडून झाडांची खरेदी करायला लागले आहेत. एका मोठ्या जांभळीच्या झाळातून किमान आठ ते नऊ कॅरेट जांभूळ निघत असते .
सुरुवातीला ७०० ते ८०० रुपये प्रति कॅरेट जांभूळ खरेदी करून चंद्रपूर,नागपूरच्या मुख्य बाजारपेठेत मोठ्या आकाराची जांभूळ बघून १२०० ते १८०० रुपये किमतीने विकली जाते . यामधील एका कॅरेटमध्ये ३५ ते ४० किलो जांभुळ असते . नंतरच्या तिसऱ्या चौथ्या फेरीत हळूहळू भाव कमी होत असून ४०० ते ५०० रुपये खरेदी करुन १००० ते १२०० रुपये प्रति कॅरेट भावाने बाजारपेठेत विकली जाते.
मागील वर्षी गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने कोरची तालुक्यातील जांभळाला थेट विक्रीसाठी नागपूर येथील मुख्य बाजारपेठेत प्रारंभ केला होता. यामुळे कोरचीच्या जांभळीला दुप्पट किंमत मिळण्यास मदत झाली असून महिला बचत गटाकडूनही जांभळाची खरेदी करून थेट नागपूरच्या बाजारातपेठेत विक्रीसाठी नेली जात आहे.
कोरची तालुक्यात निघणारी जांभूळ हे तीन प्रकारची असून त्यामधील पहिली जांभूळ ही लहान व गोल स्वरूपाची चवीला तुरट असते या जांभळीचे झाडे नदी नाल्या शेजारी असतात. ही जांभूळ सुरुवातीच्या तुरळक पावसामध्ये पिकून जाते . तर दुसरी जांभूळ ही मध्यम स्वरूपाची असून लांबट आकाराची व चवीला खूप गोड असते या जांभळीचे झाडे बहुतेक ठिकाणी आढळतात तिसरी जांभूळ म्हणजे या दोन्ही जांभळापेक्षा आकाराने मोठी आणि झाडावरून तोडल्यानंतर दोन दिवसातच अधिक गोड होते त्यामुळे या जांभळीला लोकांची सर्वाधिक पसंती असून खूप जास्त प्रमाणात मांगणी केली जाते या जांभळीची झाडे मोजक्या ठिकाणी आढळतात व पहिल्या-दुसऱ्या मुसळधार पावसात खूप जास्त प्रमाणात निघतात.
कोरची तालुक्यातील ग्रामीण भागातील दोडके, जांभळी, नवरगाव, सोनपूर, सुरवाही, काळे,भीमपूर, कोचीणारा गावांच्या जंगल परिसरात व शेतशिवारात जांभळीचे झाडे खूप जास्त प्रमाणात आहेत. तसेच तालुक्यामध्ये सर्वपरिसातील मिळून एकूण जांभळीचे झाडे अंदाजे तीन ते साडेतीन हजार इतकी असल्याची माहिती मिळाली आहे.
जांभूळ खाण्याचे अनेक फायदे
समोर आले आहेत. जांभळामध्ये विटामिन सी,कॅल्शियम, प्रोटीन,कार्बोहायड्रेट याशिवाय एंटीऑक्सीडेंट, कॅरोटीन आणि आयर्न देखील उच्च प्रमाणात असते यामुळे शरीराला अनेक प्रकारचे फायदे होत असतात उदाहरणात डोळ्याचं आरोग्य चांगलं ठेवू शकते जांभळातील काही गुणधर्मामुळे ब्लड, शुगर, ब्लड प्रेशर कंट्रोल मध्ये येते. जांभळाचे सरबत बनवून प्यायल्याने डायजेशन चांगले राहते, सेंधे मीठ टाकून खाल्ल्याने डीहायड्रेशन मध्ये फायदा होतो, बीज बारीक करून दात स्वच्छ केल्याने दात आणि हिरड्याचे समस्या दूर होतात अशी अनेक फायदे जांभळाचे आहे .