गोंडपिपरी-(सुरज माडुरवार):- गोंडपीपरी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतातील शेतीउपयोगी साहित्यांसह सबमर्शिबल मोटारपंप मोठ्या प्रमाणात चोरी झाले होते.तक्रारी प्राप्त होताच अज्ञात व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आले होते.सध्या शेतीचा हंगाम सुरू झाला असून मोटरपंप चोरीमुळे शेतकरी संकटात सापडला होता.घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन ठाणेदार राजगुरू यांनी तपासाची चक्रे तात्काळ फिरवली.सदर गुन्ह्याच्या तपासात गोपनीय माहितीच्या आधारावर विठ्ठलवाडा येथील महेश लडके, जगदीश फरकडे, शहाबुद्दीन शेख,निकेश कष्टी,प्रणित पोलोजवार,अजय कन्नके, स्वप्नील गेडाम या सात आरोपींना दि.१७ शुक्रवारी अटक करून चौकशी करण्यात आली आरोपींनी गुन्हा कबूल केला असून चोरलेल्या मोटारपंप कोठारी येथील व्यक्तीला विकल्याचे सांगितले.तात्काळ कोठारी येथील आरोपी सूरज कुचनकर,सुखदेव देरकर यांना ताब्यात घेत एकून ४५ हजार रुपयांचे मोटार पंप हस्तगत करण्यात आले.एकूण ९ आरोपींवर गुन्हा दाखल झाला असून दोन गुन्हे तपासात उघडकिस आले.ठाणेदार जीवन राजगुरू,पीएसआय धर्मराज पटले,पोलीस शिपाई शंकर मन्ने,विलास कोवे,अमित गुरनुले पुढील तपास करीत आहे.