देसाईगंज :- शासनाच्या माझी वसुंधरा अभियान अंतर्गत ३ मे ते ५ मे या कालावधीत आयोजित केलेल्या”पर्यावरण जनजागृती व स्वच्छता सप्ताहा”निमित्य ४ मे ला औद्योगिक प्रशिक्षण संस्था देसाईगंज राष्ट्रीय सेवा योजनाच्या वतीने जागतिक सायकल दिनानिमित्य माननिय विकास एन.आडे प्राचार्य यांच्या मार्गदर्शनात सायकल रॅली चे आयोजन करण्यात आले देसाईगंज शहराच्या मुख्य मार्गासह अनेक लोकवस्तीमध्ये सायकल रॅली काढण्यात आली. रॅलीमध्ये सायकल संबंधी फायदे दर्शवणारे फलक तथा जागतिक पर्यावरण दिनानिमित्त स्लोगन सायकल आणि प्ले कार्ड बॅनर लावण्यात आले. सायकल रॅली दरम्यान माननिय विकासजी आडे प्राचार्य यांचे सायकल विषयी मोलाचे मार्गदर्शन व सायकल आपल्या जीवनात किती महत्त्वाची आहे. व जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मार्गदर्शन केले. तथा सी एम गरमळे राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी यांनी सायकल विषयी माहिती दोन दशकापासून वापरात असलेल्या वाहतुकीचे साधन म्हणून सायकलचे वेगळे पण दीर्घायुष्य आणि ती एक साधी खर्चास व प्रदूषणविरहित आरोग्यदायक पर्यावरणास अनुकूल वाहन आहे त्यामुळे आपल्या दैनिक जीवनामध्ये सायकलचा उपयोग केला पाहिजे हा संदेश देसाईगंजवासियांना दिला .आणि स्वच्छ आणि पर्यावरणास अनुकूल टिकाऊ आहे,वरील सर्व बाबीचा लक्षात घेता संस्थेमध्ये जागतिक सायकल दिन राष्ट्रीय सेवा योजना सर्व स्वयंसेवक,प्रशिक्षणार्थी व संस्थेतील सर्व कर्मचारी यांच्या सहकार्याने यशस्वीरीत्या सायकल रॅली काढण्यात आली. सायकल रॅलीमध्ये सहभागी गटनिदेशक आर.एम.गोतमारे, टी. आर.खोब्रागडे, आर. के. लोही, आर. बी. भोयर,एक.व्ही. भोले, व सहभागी इतर सर्व कर्मचारी यांचे विशेष सहकार्य लाभले. सी एम गरमळे रासेयो मुख्य समन्वयक व सहसमन्वयक व्ही.वाय. नागमोती यांनी सायकल रॅली मध्ये सर्व सहभागी सर्व स्वयंसेवक व सहभागी प्रशिक्षणार्थी, कर्मचारी पोलिस प्रशासन, तहसील प्रशासन व देसाईगंजवासीय जनतेचे तालुका वार्ताहर सदस्यांचे आभार मानले व राष्ट्रगीत घेऊन सायकल रॅली ची सांगता केली.