गोंडपिपरित सामाजिक कार्यकर्त्यांनी केला सन्मान
चंद्रपूर(आशिष घुमे)
पाणीटंचाई,पर्यावरण संवर्धन,शेतकऱ्यांच्या आत्महत्या,युवकांच्या सवयी,मोबाईलचा अनावश्यक वापर,संकटात असलेली लोकशाही,धार्मिक वाद,भ्रष्ट राजकारण अशा अनेक विषयांना घेऊन एक युवक समाज परिवर्तनासाठी अनेक जिल्हे अनेक राज्य पालथी घालत आहे.
कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील नरवण गावातील रहिवाशी आशुतोष जोशी याचे शिक्षण चिपळूण तालुक्यात झाले सोबतच मुंबई व पुण्यात उच्चशिक्षण घेतले.त्यानंतर ललित कलेतील शिक्षण घेण्यासाठी इंग्लंड मधे गेला.शिक्षण पूर्ण केल्यानंतर स्कॉटलंड,स्पेन इथे छायाचित्रकरितेसह काम करून इंग्लंड येथे चांगल्या पॅकेज ची नोकरी करू लागला.परंतु पायभुमीची ओढ त्याला सारखी खुणावत होती.सहा वर्षानंतर तो भारतात परतला.आपण जगाच्या तुलनेत ५० वर्ष मागे आहों असा अनुभव आशुतोषला आला.पर्यावरण संरक्षण सोबत समाज प्रबोधनाच्या दृष्टीने आपण पूर्ण नाही तरी थोडे बदल सोबत जागृती करू शकतो या विचाराने प्रयत्न म्हणून नरवड ते ओडिशातील जगनाथपुरी पायदळ जायचा प्रवास आखला.दररोज ३५ ते ४० किलोमिटर पायी प्रवास करण्याचे उद्दिष्ट ठेवून १० एप्रिल ला प्रवासाची सुरवात केली.या प्रवासादरम्यान तो तो काही राज्ये पालथी घालणार आहे.
अनेक गावात सरपंच,सामाजिक कार्यकर्त्यांना,पर्यावरण प्रेमीना,युवकांना,विद्यार्थ्यांना भेटून तो कधी ग्रामसभा तर कधी महाविद्यालयात तर कधी सामाजिक कार्यकर्त्यांच्या आयोजनातून ठरवलेल्या बैठकीत तो सवांद साधून समाज परिवर्तनासाठी ,पर्यावरण रक्षणासाठी जनजागृती करत आहे.दि २७ गुरुवारी १२०० किलोमिटर पायदळ गाठून गोंडपिपरीत पोलिस स्टेशन येथे आयोजित बैठकीत सुरज माडूरवार,पीएसआय सिडाम,तुकाराम झाडे,निलेश संगमवार,संजय वडसकर,अशोक चीचघरे,सुहास माडुरवार,सचिन चिंतावार,अशपाक कुरेशी,समीर निमगडे,चंद्रजित गव्हारे,दिपक वांढरे,बबलू कुळमेथे,प्रसेनजीत डोंगरे,प्रमोद दुर्गे,तुकाराम सातपुते, विवेक राणा,राहुल मेकर्तीवार यांनी सन्मान केला त्यानंतर विठलवाड्यात अंकुर मलेलवार,अनिल वाग्दरकर,प्रणित पिलोजवार,घोसाई पोतराजे, निकेश कष्टी,जगदीश फरकडे,सोनू सातरे यांनी सन्मान केला.त्यानंतर आष्टी येथे गणेश शिंगाडे यांच्याकडे मुक्काम करून शुक्रवारी आलापल्ली,भामरागड, हेमलकसा मार्गे पायदळ प्रवास करणार आहे.