भद्रावती :- शासनाने राज्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांचा कार्यकाळ संपला आहे, सध्या प्रशासक कार्यभार सांभाळत आहे. ग्रामीण भागामध्ये विकासात्मक काम करीत असताना ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद ही स्थानिक स्वराज्य संस्थेची साखळी आहेत. परंतु सध्या स्थितीत प्रशासक कार्यकाळ असल्याने विकासात्मक कामे करताना अडचणी चा सामना करावा लागत आहे, तसेच आपला जिल्हा हा ओबीसी बहुल जिल्हा आहे, यामध्ये ओबीसी समाज मोठ्या प्रमाणात आहे, परंतु ओबीसी समाजाचे आरक्षण हे रद्द झालेले आहे, हा ओबीसी समाजावर अन्याय आहे, ते आरक्षण पूर्ववत करून ओबीसी समाजाला न्याय देत , ओबीसी आरक्षण सहित जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूका झाल्या पाहिजे. अशी मागणी नंदोरी ग्रामपंचायत चे उपसरपंच तथा भद्रावती तालुका सामाजिक कार्यकर्ते मंगेश भोयर यांनी सह्याद्री चा राखणदार ला बोलताना सांगितले.
ओबीसी आरक्षणाविषयी ज्या त्रुटी असतील त्या शासन दरबारी दूर करून ओबीसी समाजाला न्याय दिला जावा.अशी अपेक्षा आहे.तसेच सध्या चे निवडणूकाचे चित्र बदलेले पाहायला मिळत आहे, नवीन, सुशिक्षित, अनुभवी, काम करणारा, स्वच्छ चारित्र्य संपन्न असलेल्या उमेदवारांना जिल्हा परिषद व पंचायत समिती मध्ये सदस्य म्हणून काम करण्याची संधी उपलब्ध करून द्यावी. असे आवाहन नंदोरी ग्रामपंचायत चे उपसरपंच मंगेश भोयर ने केले. सह्याद्रीचा राखणदार शी बोलताना शरद खामनकर सरपंच ग्रा.पं. नंदोरी, शारदा जीवतोडे सदस्यां ग्रा.पं. नंदोरी, उषा लांबट सदस्या ग्रा.पं. नंदोरी, अजित पुसनाके सदस्य ग्रा.पं. नंदोरी, रवी जीवतोडे, नितेश बुरांडे, रोहन ठेंगणे, आशिष वाढई, रुपेश ठावरी, प्रकाश शेंडे, महेश निखाडे, आकाश शेंडे, हर्षल चिवंडे, नयन कामतकर, स्वप्नील चामटकर, सचिन तिखट आदी नंदोरी वासी उपस्थित होते.