बल्लारपूर :-बल्लारपूर तालुक्यातील कळमना येथील पेपरमिल डेपोला रविवारी दि २२ मे ला दुपारी २ वाजता दरम्यान भीषण आग लागून करोडो रुपयांचे बांबू व निलगरी जळून खाक झाल्याची घटना घडली. या आगीत कोट्यावधी रुपयांचा कच्चा माल जळाला.कामगार नेते तथा माजी खासदार नरेशबाबू पुगलिया यांनी घटनास्थळाला भेट देत पाहणी केली.त्यांच्या सोबत बल्लारपूर पेपर मिल चे जी एम (एच आर) प्रवीण शंकरे, अजय दुर्गेकर यांच्या कडून घडलेल्या घटनांची सविस्तर महिती घेतली याप्रसंगी विदर्भ किसान मजदुर काँग्रेस चे जिल्हा महमंत्री अशोक नागापूरे, शहराध्यक्ष देवेंद्र बेले, बल्लारपूर पेपर मिल कामगार युनियनचे वसंत मांढरे, तराशिंग कलशी, अनिल तुगीडवार उपस्थीत होते