भामरागड – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्याविरुद्ध सामाजिक माध्यमाद्वारे आक्षेपार्ह विधान करणारे अभिनेत्री केतकी चितळे यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात यावे अशी मागणी घेऊन भामरागड तालुका राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचे पदाधिकारी भामरागड पोलीस स्टेशन गाठून लेखी निवेदन दिले यावेळी पोलीस स्टेशन भामरागड चे पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर भोसले, पोलीस उपनिरीक्षक संघमित्रा बांबोळे, राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष भामरागड रमेश मारगोनवार, राष्ट्रवादी काँग्रेस शहर अध्यक्ष रमेश बोल्लमपेल्लीवार, महिला राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष नंदा नारनवरे,राष्ट्रवादी काँग्रेस सदस्य अनुप मोडक, राष्ट्रवादी काँग्रेस सदस्य किरण उसेंडी राष्ट्रवादी काँग्रेस सदस्य जाधव हलदार आदी उपस्थित होते.