गोंडपिपरी(सुरज माडुरवार)
गोंडपिपरी तालुक्यात बारमाही वाहणाऱ्या नद्यांमुळे मोठ्या प्रमाणात रेतीसाठा आहे.अशातच दर्जेदार रेतीसाठी प्रसिद्ध असलेल्या लिखितवाडा(टेकोडा)अंधारी नदीवरील रेतिघाटावर ट्रॅक्टर चालकांनी रात्री धुमाळा घातला आहे.
दि.१५ रविवारी रात्री वढोली परिसरातील व गोंडपिपरी येथील ट्रॅक्टर चालक रात्रभर रेती तस्करी करताना रात्री ११ च्या सुमारास वढोलीतील पोतरजवार यांच्या घरासमोरील विद्युत खांबाला धडक दिली त्या जबर धडकेत खांब तुटला व गावकऱ्यांना पूर्ण रात्र अंधारात काढावी लागली.विनापरवाना रात्री वाहतूक करणाऱ्या शेकडो हायवा व ट्रॅक्टर लिखितवाडा घाटात असतात या गंभीर बाबीकडे पोलीस विभागाने व महसूल विभागाने लक्ष द्यावे अशी मागणी तंटामुक्त समितीचे पदाधिकारी संदिप लाटकर यांनी केली आहे.
लिखितवाड्याडीत टेकोडा घाटात रेतीतस्करी सुरू असल्याची माहिती मिळताच यापूर्वी अनेक कारवाया केल्या आहे.रेती तस्करांच्या मागावर असून लवकरच रेती तस्करांच्या मुसक्या आवळणार.
-प्रकाश सुर्वे मंडळ अधिकारी