कोरची :- गुरुवारी सायंकाळी पाच वाजताच्या दरम्यान अचानक सोसाट्याच्या वादळ वारा व पाऊस पडल्याने कोरची तालुक्यातील विद्युत पुरवठा खंडित झाले. त्यामुळे संपूर्ण कोरची तालुका अंधारात गेलेला होता सर्व नागरिकांना वाटत होते की आता पूर्ण रात्र अंधारातच काढावी लागणार परंतु कोरची येथील वीज वितरण कंपनीचे सहायक अभियंता प्रफुल कुरसंगे यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन कोरची ते चीचगड जंगल मार्गाने येत असलेली ३३ केव्ही विद्युत वाहिनीवर काम करून सहा तासात विद्युत पुरवठा सुरळीत केला.
मसेली-पिपरखारी जंगलातून विद्युत तारांची पाहणी करत तसेच सोबतच विद्युत तारा जवळील झाडांच्या फांद्यांची छाटणीही केली शेवटी मोहांडी गावाजवळ रात्री ११ वाजताच्या दरम्यान ३३ केव्ही विद्युत वरचा इन्सुलेटर फुटलेला दिसून आला त्याला लगेच विद्युत कर्मचाऱ्यांनी बदलून नवीन इन्सुलेटर लावण्याचे काम सुरू केले दरम्यान ही माहिती फोनवरून कोरची येथील नगरसेवक गुड्डू अग्रवाल व गावातील प्रतिष्ठित व्यापारी नितीन रहेजा,नंदू पंजवानी, सामाजिक कार्यकर्ते राहुल अंबादे यांना मिळताच मदतीसाठी पिपरखारी जंगलपरिसरमार्गे मोहांडीला पोहचले तिथे त्यांना माहिती मिळाली की चीचगड येथील वीज वितरण कंपनीच ऑपरेटर विद्युत सुरू करण्यासाठी ट्रायल देण्यास टाळाटाळ करतो मग तिथे जाऊन ऑपरेटरला ट्रायल देण्यासाठी लावले त्यानंतर कोरचीतील विद्युत पुरवठा सुरू केले. ह्यामध्ये तब्बल सहा तासा लागून शेवटी मध्यरात्री १२ वाजताच्या दरम्यान कोरची तालुक्यातील विद्युत पुरवठा पूर्वरत सुरळीत झाले.
सध्या गडचिरोली जिल्ह्याभर जंगलात वन्य प्राणीचे माणसांवर अनेक हल्ले झाल्याचे घटना उघडकीस आले असून कित्येकांना जीव गमवावे लागले आहे अश्यामध्ये कोरची येथील ३३ केव्ही वि वि कंपनीचे अधिकारी सहायक अभियंता प्रफुल कुरसंगे व वरिष्ठ तंत्रज्ञ नंदकिशोर अलोनो,बलराम घाटघुमर,प्रधान तंत्रज्ञ तोहीर शेख,सह इतर कर्मचारी आपले जीव मुठीत घेऊन रात्री उशिरापर्यंत जंगलातुन काम केल्याने त्यांचे कोरचीतील नागरिकांकडून अभिनंदन केले जात आहे.
नुकतेच कोरची येथील सहायक अभियंता प्रफुल कुरसंगे यांना महावितरण महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी गडचिरोली प्रविभाग-चंद्रपूर परिमंडळ कडून आर्थिक वर्ष २०२१-२२ या कालावधीत अथक परिश्रम घेऊन गडचिरोली प्रविभागाची थकबाकी व वीज गळतीचे प्रमाण कमी करण्यासाठी केलेल्या प्रभावी कामगिरी बद्दल गडचिरोली महावितरण अधिक्षक अभियंता रवींद्र गाडगे यांच्या स्वाक्षरीचे प्रशस्तीपत्र देऊन अभिनंदन करून पुढे आपण महावितरण कंपनीसाठी असाच उत्साह,स्फूर्ती व कठोर परिश्रम घेऊन कंपनीच्या प्रगतीसाठी हातभार लावावा सदिच्छा व्यक्त केली आहे. तसेच हे प्रशस्तीपत्र कुरसंगे यांना मिळाल्याने कोरचीतील अनेक नागरिकांनीही अभिनंदन करून शुभेच्छा दिले जात आहे