आमदार किशोर जोरगेवार यांच्या प्रयत्नांना यश
चंद्रपूर :- आमदार किशोर जोरगेवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपूराव्याला यश आले असुन ग्रामीण भागाच्या विकासासाठी ग्रामविकास निधी अंतर्गत 5 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे. सदर निधीतुन मतदार संघातील ग्रामीण भागाच्या विकासकामांना गती मिळणार आहे.
ग्रामीण भागाच्या विकासावर आमदार किशोर जोरगेवार यांचा भर आहे. येथील मुलभुत सोयी सुविधा पूर्ण करण्याच्या दिशेने त्यांचे प्रयत्न सुरु असून ग्रामीण भागातील विकास कामांना गती आली आहे. नुकतेच एक कोटी रुपयांच्या कामाचे त्यांच्या हाताने भुमिपूजन करण्यात आले आहे. दरम्यान आता पुन्हा पाच कोटी रुपयांचा निधी मंजुर करण्यात आमदार किशोर जोरगेवार यांना यश आले आहे. ग्रामविकास निधी अंतर्गत सदर निधी प्राप्त झाला असून या निधीतून ग्रामीण भागातील 26 महत्वाची कामे पुर्ण होणार आहे. यात नागाळा येथे समाज भवण, चिंचाळा येथील गुरुदेव सेवा मंडळाच्या खुल्या जागेवर सौरक्षण भिंत, चिंचाळा येथे काॅंक्रिट रोडचे काम, नागाळा येथे पांदन रस्ता, शेणगाव येथे समाजिक सभागृह आणि पांदन रस्ता, सोनेगाव येथे व्यायामशाळा व पांदन रस्ता, कोसारा येथे व्यायामशाळा व सिमेंट काॅंक्रिट रोडचे बांधकाम, पडोली येथे बुध्दविहाराचे सौदर्यीकरण आणि सिमेंट काॅंक्रिटरोडचे काम, शिदुर येथे सभागृह आणि पांदन रस्त्याचे बांधकाम, मोरवा येथे सामाजिक सभागृह आणि पांदन रस्त्याचे बांधकाम, मोरवा येथे सामाजिक सभागृह आणि रस्त्याचे खडीकरण, म्हातारदेवी येथे पांदन रस्ता व सामजिक सभागृहाचे बांधकाम, खुटाळा येथे सामाजिक सभागृह आणि काॅंक्रिट रोडचे बांधकाम, खुल्या जागेवर सौदर्यीकरण, दाताळा येथे सामाजिक सभागृह आणि सिंमेट रोडचे बांधकाम आणि धानोरा येथे पांदन रस्त्याचे बांधकाम आदि कामांचा समावेश आहे. सदर कामांमुळे ग्रामीण भागाच्या विकासाला गती मिळणार आहे.