logo

HOME   पोलीस न्युज

दीड कोटींच्या दारूवर मारला बुलडोजर ने ताव...!

दीड कोटींच्या दारूवर मारला बुलडोजर ने ताव...!

चंद्रपूर जिल्ह्यात एप्रिल 2015 पासून दारूबंदी झाली मात्र छुप्या मार्गाने अजूनही दारू तस्करी सुरु आहे.अशातच चंद्रपूर शहरातील रामनगर पोलिसांनी जप्त केलेल्या दीड कोटींच्या अवैध दारूसाठ्यावर  रोडरोलर चालवून दारू नष्ट केली.पडोली एमआयडीसी परिसरात असलेल्या खुल्या जागेवर हि दारू नष्ट करण्यात आली.यात जवळपास 1235 देशी दारूच्या पेट्या व 238 विदेशी पेट्याचा समावेश आहे.हि दारू पोलीस अधीक्षक मोहेश्वर रेड्डी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नांदेडकर यांच्या आदेशाने नष्ट करण्यात आली.यावेळी रामनगरचे पोलीस निरीक्षक प्रकाश हाके. पोलीस निरीक्षक शेवाळे.उपपोलिस निरीक्षक मोरे, उत्पादन शुल्क विभागाचे दुय्यम निरीक्षक अमित क्षीरसागर.गजू दहीफोडे व इतर पोलीस कर्मचारी उपस्थित होते.Related Video


Top