logo

HOME   पोलीस न्युज

आयकर आणि पोलीस अधिकारी असल्याचे सांगुन दरोडा टाकणाऱ्या आरोपींना अटक

आयकर आणि पोलीस अधिकारी असल्याचे सांगुन दरोडा टाकणाऱ्या आरोपींना अटक

ठाणे : दिनांक 5/8/2018 रोजी रात्री 10:30 वाजता ओमकार टॉवर जुना पाडा काशिमीरा येथे राहणाऱ्या गोविंद छोटेलाल सिंग ह्यांच्या घरी तिन इसमांनी आपण इन्कमटँक्स अधिकारी असल्याचे सांगुन प्रवेश केला व लायटर पीस्तुलाचा धाक दाखवुन त्यांचे व त्यांच्या पत्नि चे हातपाय बांधून तिजोरी मधिल 3,00,000/- ( तिन लाख ) रुपये, 10 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने असा ऐवज चोरून नेला , त्या संदर्भात गोविंद सिंग यांनी कशिमीरा पोलीस ठाणे येथे सम्पर्क साधून गुन्हा दाखल केला , असा गंभीर स्वरूपाचा दाखल झाल्या नंतर ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ .शिवाजी राठोड यांनी वेगवेगळी पोलीस पथक तयार करून तपासाला सुरुवात केली , ह्या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखा करत असताना , त्यांच्या सोसायटीमधिल सीसीटीव्ही फुटेज , तांत्रिक विश्लेषण व गुप्त बातमीदारांकडुन कडुन मिळालेल्या माहितीच्या आधारे दिनांक 26/8/2018 रोजी मुख्य आरोपी फैयाज कदर काझी वय 47 वर्ष याला चिंचवड यास पुणे येथुन अटक केली , त्याच्या कडे चौकशी केली असता त्याने इतर चार साथीदारांच्या मदतीने गुन्हा केल्याचे कबुल केले , त्या चार आरोपी 1) मानव सुशील सिंग वय 19 वर्ष राहणार कनकिया मीरारोड 2) शोएब मन्सुर मुन्शी वय 19 राहणार जीसीसी क्लब जवळ मीरा रोड 3) सलीम उर्फ साहील फिरोज अन्सारी वय 21 राहणार बुरहानपुर राज्य मध्य प्रदेश 4) इम्रान मुन्ना अली वय 25 राहणार मुंब्रा ठाणे यांना अटक करण्यात आली , हा गुन्हा दरोड्याचा असल्याने या मध्ये 395 कलम वाढवण्यात आले , हे सर्व आरोपी विशेष शिकलेले नसुन टवाळखोरी करत फिरत असत , त्यातील मुख्य आरोपी फैयाज काझी ह्याचा मुंबई येथे भंगारचा धंदा होता , तेथेच एका हॉटेल मध्ये सलीम आणि इम्रान हे वेटरचे काम करत होते तिथेच त्यांची फैयाज काझी बरोबर ओळख झाली होती , शोएब हा फैयाजचा भाचा असुन त्याने आणि मानव याने गोविंद सिंग याच्या घरचा पत्ता , आर्थिक स्थिती , घरातील एकूण सदस्य त्यांच्या येण्याजाण्याची वेळ या बद्दलची इत्यंभूत माहीती फैयाज , सलीम आणि इम्रान यांना माहीती पुरवली व या माहितीच्या आधारे त्यांनी हा गुन्हा केला , सात आठ दिवसांपासून त्यांनी या सगळ्या ठिकाणाची माहीती काडली होती , ह्या आरोपींकडून चोरलेले 2,75,000/- रुपये व दहा तोळ्याचे सोन्याचे दागिने गुन्ह्यात वापरलेले खोटे लायटरचे पिस्तूल , हण्ड्ग्लोज सह मोबाईल फोन हस्तगत करण्यात आले , त्यांनी अशा प्रकारचे अजुन काही गुन्हे केले आहेत का याची सखोल चौकशी पोलीस करत असल्याचे पोलीस अधीक्षक डॉ .शिवाजी राठोड यांनी सांगीतले .


Top