logo

HOME   महाराष्ट्र

मतदानाच्या अगोदर 48 तासांमध्ये एक्झिट पोल व ऑपिनियन पोलवर बंदी

मतदानाच्या अगोदर 48 तासांमध्ये एक्झिट पोल व ऑपिनियन पोलवर बंदी

गडचिरोली:- : निवडणुकीच्या आधी 48 तास ऑपिनियन पोल, एक्झिट पोल दाखविता, छापता व सामाजिक माध्यमांवर अपलोड करता येणार नाही. आचारसंहितेचा भंग होणाऱ्या चुकीच्या बातम्या, अफवा याबाबतही बातम्या प्रसिद्ध करताना किंवा पोस्ट प्रसिद्ध करताना सर्व प्रकारच्या माध्यमांनी उचित काळजी घ्यावी. यासाठी पोलीस विभागातील सायबर सेल सतत लक्ष ठवून आहे. येत्या 48 तासात विविध बाबी माध्यमे, उमेदवार व नागरीक यांना अवलंबणे बंधनकारक असते. 
यामध्ये प्रचार कालावधी संपल्यानंतर म्हणजेच मतदानाच्या 48 तास अधी विधानसभा क्षेत्राच्या बाहेरील राजकिय व्यक्तींना जिल्हयात थांबता येत नाही. या कालावधीत सभामंडप, सभागृह यांची तपासणी केली जाते. तसेच लॉज, गेस्ट हाऊस, शासकीय विश्रामगृह या ठिकाणीही बाहेरील व्यक्तींची कसून चौकशी केली जाते. यावेळी संबंधित व्यवस्थापकांनी प्रशासनाला सहकार्य करावे. विधानसभा क्षेत्रांच्या सीमेवर चेक पोस्टवर तपासणी करून बाहेरून येणा-या वाहनांवरही यावेळी लक्ष ठेवण्यात येते. एका ठिाकणी जमा होणा-या गटांवर बारीक पाळत ठेवून त्यांची ओळखीबाबत तपासणी केली जाते. यावेळी त्यांच्याकडे स्थानिक ओळखपत्र असणे आवश्यक आहे. दारूबंदी जिल्हा असल्यामुळे व निवडणूक काळात दारूबंदी असल्याने याठिकाणी कोणत्याही प्रकारे दारू विक्री अढळल्यास त्यांच्यावर कडक कारवाई होणार आहे. कोणलाही मतदान कालावधी संपेपर्यंत लाऊड स्पीकर वाजविण्याचे अधिकार राहणार नाहीत. तसेच उमेदवार,राजकीय पक्ष व इतर कोणालाही येत्या 48 तासात सार्वजनिक ठिकाणी तसेच मंगल कार्यालय, सभागृह अशा ठिकाणी प्रचार करण्यास बंदी आहे. 

*जिल्हाधिकारी म्हणाले* -
मतदानाची वेळ सर्व मतदारांनी लक्षात ठेवा. सकाळी 7.00 ते दुपारी 3.00
लोकसभेच्या टक्केवारीचा विक्रम पार करूया
आरमोरी 105 मतदान केंद्राच्या पार्टी दाखल तर गडचिरोली 90 व अहेरी 223 पार्टी दाखल
जिल्हयात 85 लक्ष रूपये कॅश व लिकर ताब्यात
मतदान केंद्राच्या 100 मी आत 144 कलम लागू
सीमारेषेवरील 5 किमीपर्यंत दारूबंदी ड्राय डे
50 सुक्ष्म निरीक्षिक नेमण्यात आले आहेत
2.77 लक्ष मतदारांना मोबाईल संदेश व ऑडीओ कॉल करून मतदान करण्याचे आवाहन
जिल्हयात ५ सखी मतदान केंद्र
96 ठिकाणी वेबकास्टींग तर 100 ठिकाणी व्हीडीओ रेकाँर्डीग
4120 कर्मचारी करणार मतदान प्रक्रियेत प्रत्यक्ष कार्य
गरोदर महिला, दिव्यांग व वृध्दांसाठी रांगेची आवश्यकता नाही.


Top