logo

HOME   महाराष्ट्र

वरोरा येथील शासकीय कंत्राटदार मगरे यांच्या वाहन चालकाचा संशयास्पद मृत्यू

वडिलांचा घातपाताचा आरोप ; रेल्वे पोलीस ने पंचनामा न करता वरोरा पोलिसाने केल्याने प्रकरण संशयाच्या भोवर्‍यात

वरोरा येथील शासकीय कंत्राटदार मगरे यांच्या वाहन चालकाचा संशयास्पद मृत्यू

वरोरा : येथील बोर्ड चौक जवळील वांढरे ले - आउट च्या पाठीमागे रेल्वे रुळाजवळ एका युवकाचा मृतदेह  बेवारस स्थितीत असल्याची माहिती मगरे यांनी वरोरा पोलिसांना दिली होती. मृतदेह अनोळखी असल्याने पोलिसांनी  मृतदेह वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केला. मात्र दिनांक 4 तारखेला तो बेवारस मृतदेह मगरे यांच्याच वाहन चालकाचा असल्याचे चांगलीच खळबळ उडाली. कामावर गेलेला मुलगा बेपत्ता होऊन अचानक मृतावस्थेत  मिळाल्याने परिवाराला मोठा जबर धक्काच बसला चक्क मालकांनाच मृतदेह ओळखला नसल्याने घरच्यांनी संशय व्यक्त करत हा अपघात नसून घातपात असल्याचा आरोप करीत वरोरा पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली आहे.



सदर घटना ही दि. 3 ऑक्टो च्या रात्री 9.30 वाजताच्या दरम्यानची आहे. मृत प्रशांत हा मगरे यांच्या कडे चालक म्हणून काम करत होता.तो  कामावरून घरी न परतल्याने चिंताग्रस्त घरच्यांनी त्याचा  शोध घेण्यास सुरूवात केली व शोध न लागल्याने पोलीस स्टेशन येथे तक्रार देण्याकरीता गेले असता प्रशांत याचा मृत्यू झाल्याची खळबळजनक बाब घरच्यांच्या समोर  आली.



यानंतर बेवारस स्थितीत आढळलेला मृत्यू देह हा  प्रसिद्ध कंत्राटदार प्रमोद मगरे यांच्या वाहन चालक  असल्याचे निष्पन्न झाले. पांच्यानाम्या वरून त्याच्या शरीरावरील जखमेचे निरीक्षण केले असता त्याच्या मांडीचे हाड बाहेर निघून मोठी जखम झालेली  आढळून आली. त्यावरून त्याला मारून रेल्वे रुळावर फेकले असावे असा संशय  मृतकाच्या नातेवाइकाकडून व्यक्त केला जात होता. त्याबाबत मृतकाचे वडिलांनी माझ्या मुलाचा मृत्यू रेल्वेने कटुन झाला नसून त्याचा घातपात  करण्यात आला अशी तक्रार वरोरा पोलीस स्टेशनला केली असल्याने एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे प्रशांतचा मृत्यू संशयाच्या भोवऱ्यात अडकलेला आहे.



मृतक प्रशांत कडू बेलेकर हा येथील कंत्राटदार प्रमोद मोगरे यांच्या वाहनावर मागील पाच महिन्यापासून वाहन चालक चे काम करीत होता. 3 ऑक्‍टोबरला सकाळी वाहन घेऊन कामावर गेल्यानंतर परत संध्याकाळी पाच वाजता मगरे यांचेकडे वाहन उभे करून वाहनाची चाबी मगरे यांच्याकडे देऊन निघून गेला असल्याची माहिती मगरे यांनी दिली. तेव्हापासून प्रशांत हा  बेपत्ता अवस्थेत होता मगरे यांच्या घराचे पाठीमागे रेल्वे रुळाजवळ  रात्री  कोणीतरी किंचाळले व जोरात आवाज आला असे  प्रमोद मगरे यांनी सांगितले. त्यानंतर 3  ऑक्‍टोबरला फोन करून पोलिस स्टेशनला त्यांनी कळविले पोलिसांनी बेवारस अवस्थेत असलेल्या मृतकाचे शरीर उलटून पाहिले असता मगरे यांनी मृत व्यक्ती अनोळखी असल्याची माहिती  दिली. वरोरा पोलिसांनी रेल्वे रुळाजवळ असलेल्या मृत्यू देहाला रेल्वे पोलिसांची मदत न घेता अनोळखी मर्ग दाखल करून घेतला. या सर्व प्रकरणात सर्व बाबी संशयास्पद असल्याने घरच्यांनी संशय व्यक्त करत घातपात असल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे उपजिल्हा रुग्णालयात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.नंतर पोलिसांनी प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याचे आश्वासन दिल्याने मध्यस्थीने तणावपूर्ण वातावरण शांत करण्यात आले व शवविच्छेदन करून मृतदेह  हलविण्यात आला.तसेच काही प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधी यांनी मृतकाच्या वडील व भावाला विचारले असता माझ्या मुलाचा खूनच करण्यात आला तेव्हा पोलिसांकडून सखोल चौकशी करून न्याय मिळावा अशी मागणी केली आहेत. मात्र स्थानिक पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यात विशेष लक्ष घालून  सखोल चौकशी करण्याची मागणी मृतकाच्या वडिलांनी केली आहे. 



Top