logo

HOME   महाराष्ट्र

शासकीय कर्मचाऱ्यांची गळचेपीकरणाऱ्या त्या शासन निर्णयांची आज शिक्षक करणार होळी

शासकीय कर्मचाऱ्यांची गळचेपीकरणाऱ्या त्या  शासन निर्णयांची  आज शिक्षक करणार होळी

वरोरा :- शासकीय कर्मचाऱ्यांची गळचेपी करून त्यांचे न्याय्य हक्क हिरावून घेणाऱ्या शासन निर्णयांची आज तालुक्यातील शिक्षक होळी करून निषेध व्यक्त करणार आहे .शासकीय कर्मचाऱ्यांची गळचेपी करून त्यांचे संवैधानिक हक्क नाकारण्याचे दू:साहस करणाऱ्या शासनाचा सार्वत्रिक निषेध करणे गरजेचे आहे. घरभाडे भत्ता हा वेतनाचाच एक भाग असतानाही शासकीय कर्मचाऱ्यांना ग्रामसभेच्या ठरावाची सक्ती करून त्यांचे वेतन पळविण्याची अन्यायकारक कृती शासन करते आहे. शिवाय न्याय हक्कासाठी आंदोलन करणे हा आमचा संवैधानिक अधिकार असतानाही चळवळ मोडीत काढण्यास्तव शासनाने काढलेले १८ सप्टेंबरचे परिपत्रक केवळ निंदनीय आहे.   शिक्षकांच्या आत्मसन्मानासाठी वचनबद्ध असलेला अखिल भारतीय प्राथ.शिक्षक संघ अशावेळी स्वस्थ बसू शकत नाही. आपल्या न्यायिक हक्काच्या रक्षणासाठी आज दिनांक २१.०९.२०१९ रोज शनिवारला दुपारी ०२:०० वाजता तहसील कार्यालय,वरोरा च्या प्रवेश द्वारावर उपरोक्त दोनही शासन निर्णयांची होळी करून आपल्या ज्वलंत भावना निवेदनाच्या माध्यमातून   सरकार ला सुपूर्द करणार आहोत.तरी  सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन संघटनेचे तालुका अध्यक्ष धनराज रेवतकर यांनी केले आहे . पदाधिकाऱ्यांच्या वतीने करण्यात आले आहे .Top