logo

HOME   महाराष्ट्र

कमी किंमतीत ट्रक्टर देण्याच्या नावाखाली शेतकऱ्यांची फसवणुक!

देसाईगंज पोलीस स्टेशनला तक्रार

कमी किंमतीत ट्रक्टर देण्याच्या नावाखाली शेतकऱ्यांची फसवणुक!

गडचिरोली :- गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज येथिल राजेंद्र वार्डात ब्यॅुटी पॉर्लरच्या आड अत्यल्प किंमतीत महागड्या वस्तु देण्याचे आमिष दाखवुन  करोडोने रुपयाने गंडविणाऱ्या आरोपी शबाना उर्फ शिफा राज मोहमद चौधरी या प्रकरणाची शाई वाळत नाही तोच,कमी किंमतीत ट्रक्टर उपलब्ध करुन देण्याचे आमीष दाखवुन देसाईगंज तालुक्यातील शेतकऱ्यांची आर्थिक फसवणुक केल्याची खळबळजनक माहिती उघडकिस आली असून देसाईगंज पोलीस स्टेशनला फसगत झालेल्या शेतकऱ्यांनी तक्रार दाखल केली असल्याने लवकरच गुन्हा दाखल होण्याची दाट शक्यता वर्तविल्या जात आहे.रविंद्र संपतराव कुडमाटे,क्वार्टर नंबर ८६६१, डिफेंस कॉलनी,अंबाझरी, नागपुर ह्याने नात्याने साळभाऊ लागत असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात देसाईगंज तालुक्यातील शिवराजपुर येथील धनराज श्रीहरी येलतुरे याला हाताशी धरुन कमी किंमतीत ट्रक्टर देण्याच्या नावाखाली तालुक्यातील शेतकऱ्यांना गाठुन प्रचार व प्रसार करुन नागपुरच्या रविंद्र कुडमाटेशी भेट करुन देत असायचा. या शेतकऱ्यांना कंपनीने जप्ती केलेले ट्रक्टर त्या कंपनी च्या चौकीदाराला पटवुन आपलेच असल्याचे भासवुन ट्रक्टरचे बनावट कागदपत्रासह दाखवायचा.ग्राहकाला ट्रक्टर आवडल्यानंतर ट्रक्टरची किंमत ठरवुन रुपये १००/- किंमतीच्या स्टँम्प पेपरवर करारनामा करुन ग्राहकांकडुन रक्कम वसुल करुन ट्रक्टर ट्रांसफर बाबतीत कागदपत्राची कारवाई झाली की, ट्रक्टर देण्याची ग्वाही देतो व न दिल्यास आपल्या नावाचा बँकेचा चेक देखिल दिलेला आहे.यावर विश्वास ठेवत देसाईगंज तालुक्यातील किन्हाळा येथिल नेताजी भर्रे व  मोहटोला येथील   दिलीप दोनाडकर यांनी करारनाम्यानुसार संपुर्ण रक्कम देऊन स्टँम्प पेपर व रविंद्र कुडमाटेने दिलेला धनादेश घेतला.बराच कालावधी उलटुन रविंद्र कुडमाटेने ट्रक्टर न दिल्याने तसेच फोनवर उडवाउडवीचे उत्तर देऊन वेळ मारुन नेत असल्याने,रविंद्र कुडमाटेने दिलेला धनादेश वटविण्यासाठी बँकेत टाकले असता काहींना दिलेल्या धनादेशवर खोटी स्वाक्षरी आहे, असे बँकेने दिलेल्या अहवालात नमुद केले आहे,तर काहीना खात्यात अपुरी रक्कम असल्याने धनादेश वटला नसल्याचे उत्तर मिळाले.त्यामुळे,केलेला करारनामा व दिलेला धनादेश पुर्णत: बनावट व खोटे असल्याचे समजल्यानंतर आपली दिलेली रक्कम वापस करण्यासाठी शिवराजपुर येथील धनराज श्रीहरी येलतुरे याला विनवनी केली परंतु, त्याने हातवर केले.परिणामी,किन्हाळा येथील नेताजी भर्रे व मोहटोला येथील दिलीप दोनाडकर यांनी स्टँम्प पेपर व रविंद्र कुडमाटेने दिलेला धनादेश घेऊन देसाईगंज पोलीस स्टेशनला फसगत झाल्याची लेखी तक्रार दाखल केली आहे. रविंद्र कुडमाटे व धनराज येलतुरे या दोघांनी मिळुन देसाईगंज तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांची आर्थिक फसवणुक केल्याची माहिती पुढे येत असून आणखीन किती शेतकऱ्यांची फसवणुक केली याबाबत अंतीम आकडा अद्याप तरी गुलदस्त्यातच आहे.Top