logo

HOME   महाराष्ट्र

भामरागड पुरग्रस्तांकरिता मदतीचे आवाहन

देसाईगंज नगरपरीषदचा पुढाकार

भामरागड पुरग्रस्तांकरिता मदतीचे आवाहन

देसाईगंज(डॉ विष्णु वैरागडे) दि १९                       गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम, आदिवासीबहुल व नक्षलग्रस्त भामरागड येथे अतिवृष्टीमुळे बाधित पुरग्रस्तांना १९ सप्टेंबर ते २२ सप्टेंबर या दरम्यान  सकाळी १० वाजेपासुन सायंकाळी ६ वाजेपर्यंत जीवनावश्यक वस्तुंच्या स्वरुपात मदत करण्याचे आवाहन देसाईगंज नगरपरीषदने केलेला आहे.                           भामरागड परिसरात अतिमुसळधार पावसाने फारच गंभीर परिस्थिती निर्माण होऊन संपुर्ण तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.त्यामुळे सामाजिक बांधिलकी म्हणुन भामरागड पुरग्रस्तांना देसाईगंज शहरातील सर्व नागरिक,विविध राजकिय पक्ष, सामाजिक संस्था, विविध मंडळ,स्वयंसहायता बचत गट, व्यापारी,दुकानदार यांनी अत्यावश्यक जीवनावश्यक वस्तुंच्या स्वरुपात मदत करण्याचे आवाहन देसाईगंज नगरपरीषदने केलेला आहे.                          यावेळी आरमोरी निर्वाचन क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे, नगराध्यक्ष शालू दंडवते,उपाध्यक्ष मोतीलाल कुकरेजा,भाजपा जिल्हाध्यक्ष किसन नागदेवे, उपविभागीय अधिकारी विशालकुमार मेश्राम, तहसिलदार सोनवाने,मुख्याधिकारी डॉ.कुलभुषण रामटेके,नायब तहसिलदार दिपक गुत्थे,भाजपा तालुका अध्यक्ष राजेश जेठानी, नगरसेवक नरेश विठलानी, सचिन खरकाटे, दिपक झरकर, करुणा गणवीर, आशा राऊत, लाला रामटेके, संतोष शामदासानी व नगरपरीषदनचे संपुर्ण कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.Top