वरोरा :- शहरातील  सरकार ग्रुप कडून मागील वर्षांपासून  डॉ एपीजे अब्दुल कलाम चौक(रत्नमाला चौक )येथे  गणेश उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो .या वर्षी ही सरकार ग्रुप सार्वजनिक"> वरोरा : शहरातील  सरकार ग्रुप कडून मागील वर्षांपासून  डॉ एपीजे अब्दुल कलाम चौक(रत्नमाला चौक )येथे  गणेश उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो .या वर्षी ही सरकार ग्रुप सार्वजनिक"/>
logo

HOME   महाराष्ट्र

भक्तीला समाजकार्याची जोड - प्रतिभाताई धानोरकर

सरकार ग्रुप तर्फे गरजू होतकरू विद्यार्थ्यांना सायकल वाटप

भक्तीला समाजकार्याची जोड - प्रतिभाताई धानोरकर

वरोरा :- शहरातील  सरकार ग्रुप कडून मागील वर्षांपासून  डॉ एपीजे अब्दुल कलाम चौक(रत्नमाला चौक )येथे  गणेश उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो .या वर्षी ही सरकार ग्रुप सार्वजनिक गणेश मंडळाच्या वतीने श्री गणेश मूर्ती मांडण्यात आली .दहा दिवस मोठ्या भक्ती भावाने पूजा पाठ आणि विविध उपक्रम राबविण्यात आले .आज  गणरायाच्या विसर्जनाच्या पूर्व संध्येला  आज (11 सप्टेंबर )ला या ग्रुप च्या पदाधिकाऱ्यांनी भक्तीला समाजकार्याची जोड देत होत करू व गरजू विद्यार्थ्यांना सायकल वाटप करून पुन्हा एका सामाजिक  उपक्रमात भर घातली असे मत  सौ प्रतिभाताई धानोरकर यांनी केले .
शहरातील सर्व धर्मीम युवकांचा सोशल ग्रुप अशी या गृप ची ओळख आहे .या ग्रुप मध्ये सर्व धर्मीय युवक असून सर्व जाती धर्माचे उत्सव तेमोठ्या  उत्साहाने साजरे करतात . या ग्रुप ची स्थापना 2017 मध्ये  ईद मिलादुन्नबी या शुभ दिनी करण्यात आली .आणि विविध उपक्रम राबवित अवघ्या काही वर्षातच सरकार ग्रुप हे नाव सर्वांच्या मुखी यायला लागले .मग रुग्णांकरिता रुग्णवाहिका असो , की गरीब निराधारांना दररोज चे जेवन असे विविधी उपक्रम या ग्रुप ने राबविले त्यात अजून एका उपक्रमाची भर पडली ती म्हणजे आज झालेल्या गरीब , होतकरू विद्यार्थ्यांना केलेल्या सायकल वाटप या उपक्रमामुळे,या कार्यक्रमात प्रमुख पाहुण्यांच्या हस्तेअनायरा शेख , राधिका अरुण कातोरे , नितेश घाटे , वेदांत बोढे  , प्रीती वाटकर , आफरीन शेख या  विद्यार्थ्यांना  सायकल वाटप करण्यात आले .यावेळी प्रतिभाताई धानोरकर , डॉ सागर वझे , सुनील वरखडे, प्रमोद मगरे , राजू महाजन , शुभम चिमुरकर , प्रवीण काकडे ,संदीप सोनेकर , सरकार ग्रुप चे अध्यक्ष कासिफ खान उपस्थित होते .या कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता सरकार गृप च्या सदस्यांनी अथक परिश्रम घेतले .कार्यक्रमानंतर महाप्रसाद वितरित करण्यात आला .


Related Video


Top