logo

HOME   महाराष्ट्र

विसर्जन साठी नाल्यावर गेलेला इसम पुरात गेला वाहून

विसर्जन साठी नाल्यावर गेलेला इसम पुरात गेला वाहून

 गडचिरोली:- गावातील गणपती विसर्जन साठी नाल्यावर गेलेल्या इसम पुरात वाहून गेल्याची घटना आज दुपारी 12:30 च्या दरम्यान मुलचेरा तालुक्यात घडली.   भगीरथ मोतीराम हिवरकर वय 40 वर्ष असे वाहून गेल्या इसमाचे नाव असून बारसवाडा येथील रहिवासी असून त्याच्यामागे पत्नी एक मुलगा आणि एक मुलगी असा आप्त परिवार आहे. घटनेची माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन समिती,पोलीस प्रशासन आणि गावकाऱ्यांसोबत शोध मोहीम राबवीत आहेत.                   आज सकाळी बारसवाडा येथील काही लोकं गावातील गणपती विसर्जन साठी 12 वाजताच्या दरम्यान मुलचेरा मुख्य रस्त्यावरील नाल्यावर गेले होते. गणपती विसर्जन झाल्यावर नारळ पाण्यात टाकतो म्हणून उतरत असताना पाय घसरून पाण्यात पडल्याने भगीरथ हिवरकर पुरात वाहून गेल्याची माहिती आहे. नाल्यात खूप पाणी असल्याने सदर व्यक्ती बाहेर निघू शकला नाही तात्काळ गावकऱ्यांनी शोध मोहीम राबविला आणि प्रशासनाला ही माहिती दिली त्यानंतर मुलचेरा चे तहसीलदार आर व्ही तलांडी आणि त्यांची चमू तसेच मुलचेरा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक एम एस पाठक आणि त्यांची चमू सर्वांनी जवळपासच्या गावाजवळून वाहणाऱ्या नाल्यात शोध मोहीम सुरू केली.मात्र, अद्यापही वाहून गेलेल्या इसम मिळाला नाही. अजूनही शोध कार्य सुरूच आहे.        एकंदरीत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीकडून वारंवार सूचना देऊनही अशा घटना होत आहेत त्यामुळे लोकांनी सतर्कता बाळगणे आवश्यक आहे.Related Video


Top