logo

HOME   महाराष्ट्र

अकोट तालुक्यातील ग्राम पणज येथे बैल पोळा उत्साहात साजरा

अकोट तालुक्यातील ग्राम पणज येथे बैल पोळा उत्साहात साजरा

कुशल भगत आपला व शेतकऱ्यांचा महत्त्वाचा सण म्हणजे पोळा आज दिनांक 30 ऑगस्ट शुक्रवारी संध्याकाळी पणज येथील. निलकमल चौक बारगण पुरा. तसेच गोठान .येथील गोर्वधन महाराज मंदिर परिसरात अशा प्रकारे मोठ्या उत्साहात पणज येथे पोळा हा सण साजरा करण्यात आला या वेळी पणज ग्रामस्था मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी. पोळ्या मध्ये बैल सजावट करून आले होते तर ढोलांच्या गजरात हर .हर महादेव च्या जय घोषाने पणज नगरी दुमदुमून गेली होती पोळ्या अगोदर सर्व प्रथम. गावामधून वाजत.गाजत. गुळी .काढण्यात आली नंतर पोळ्या मध्ये आलेल्या बैलांचे पुजन.व ठोबरा लावण्यात आला. यावेळी. महादेवाच्या गिताने परीसर आनंदात दिसत होता. यावेळी. पणज. ग्रामस्था .आणी. शेतकरी बांधव .मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Top