logo

HOME   महाराष्ट्र

नाट्य प्रशिक्षण कार्यशाळा व सत्कार सोहळा संपन्न

नाट्य प्रशिक्षण कार्यशाळा व सत्कार सोहळा संपन्न

 सागर मुने, वणी : येथील सागर झेप बहुद्देशीय संस्था नगरवाचनालयाच्या वतीने नाट्य मार्गदर्शन व प्रशिक्षण कार्यशाळेचे  आयोजन करून प्रा. हेमंत चौधरी यांचा सत्कार  करण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगर वाचनालयाचे सचिव गजानन कासावार हे होते. प्रमुख अतिथी म्हणून नागपूर चे नाट्यराज्य पुरस्कार प्राप्त अभिनेता, दिग्दर्शक गौरव श्रीरंग व नाट्य दिग्दर्शक, नेपथ्य कार, पार्श्वसंगीत सुशील सरोदे, जेष्ठ नाट्यकर्मी अशोक सोनटक्के  हे उपस्थित होते.            महाराष्ट्र शासन पु ल देशपांडे एकपात्री अभिनय स्पर्धेत पारितोषिक विजेते प्रा. हेमंत चौधरी यांच्या या प्रसंगी शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. त्यानंतर सुशील सरोदे यांनी उपस्थितांना नाट्य कलेतील बारकावे समजावून सांगत नाटकांच्या छंदातून व्यक्तिमत्वाचा कसा विकास होतो हे समजावून सांगितले. त्यानंतर गौरव श्रीरंग यांनी स्वतः च्या आयुष्यातील एक एक अनुभव सांगून नाट्यकलेत कसे पारंगत व्हायचे हे उदाहरणा सह समजावून सांगितले. नाट्यक्षेत्रात येणाऱ्या अनुभवावरून सुद्धा स्वतःला सिद्ध करावे लागते हा मंत्र उपस्थितांना दिला. या प्रसंगी अशोक सोनटक्के व गजानन कासावार यांनी समयोचित मार्गदर्शन केले.      या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सागरझेप संस्थेचे अध्यक्ष सागर मुने यांनी केले. सूत्रसंचालन निकिता बोबडे व आभार प्रदर्शन प्रवीण सातपुते यांनी केले. या कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी राणी हांडे, साक्षी खुसपुरे, प्रणय मुने, मंगेश गोहोकार, अमोल खडसे, शंतनू मुने यांनी अथक परिश्रम घेतले.Top