logo

HOME   महाराष्ट्र

माजी राज्यमंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी पूर पीडितांची घेतली भेट

तात्काळ मदतीसाठी उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन सादर

माजी राज्यमंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी पूर पीडितांची घेतली भेट


भामरागड:- नुकतेच अतिवृष्टीमुळे भामरागडला पुराचा फटका बसला. अनेकांच्या घरात  दोनदा  पाणी शिरल्यामुळे पुरपीडित  नागरिकांचे बेहाल झाले.त्यामुळे सोमवार 19 आगष्ट रोजी माजी राज्यमंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी  भामरागडचा दौरा करून पूर पीडितांची भेट घेऊन आस्थेने विचारपूस केले आणि पीडितांच्या मदतीसाठी शासन दरबारी पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन देऊन उपविभागीय अधिकारी तथा भामरागड चे तहसीलदार कैलास अंडील यांच्या कडे निवेदनही दिले.
     भामरागडच्या शोभानगर, आंबेडकर नगर, बाजारवाडी, अन्य व मुख्य रस्त्यांवरील दुकान आणि घरात पुराचे पाणी शिरून नागरिकांचे अतोनात नुकसान व पुराने दोनदा बेहाल केले. पुरामुळे संसारातील  साहित्य सामुग्री वाहून गेल्यामुळे गरीब नागरिक चिंतेच्या खाईत ढकलल्या गेल्यामुळे त्यांना मदतीची अत्यंत गरज आहे यासाठी आपण स्वतः राज्याचे मुख्यमंत्री यांची भेट घेऊन मदतीसाठी बोलणार असल्याचे पुरपीडित नागरिकांना सांगून माजी राज्यमंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी दिलासा दिले.
     तसेच भेटी दरम्यान नागरिकांनी पावसाळ्यात वारंवार पुरामुळे पुलावरून पाणी वाहत असते आणि जगाचा संपर्क तुटत असते याकडे माजी राज्यमंत्री धर्मराव बाबा आत्राम यांना लक्ष वेधून पुलाची उंची वाढविण्यासाठी प्रयत्न करा अशी नागरिकांनी विनवणी करताच आपणही त्यासाठी प्रयत्नशील असल्याचे माजी राज्यमंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी बोलून दाखविले.
     ज्या ज्या भागात पुराने वेढले आणि घरात पाणी  घुसून अतोनात नुकसान झाले अशा सर्व ठिकाणी भेटी देऊन माजी राज्यमंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी अडी  अडचणीच्या वेळी मी सदैव आपल्या पाठीशी असल्याचे बोलून दाखविले. तसेच गरजू आणि  अत्यंत गरिबांना चादरी वितरित केले व अन्य मदतीसाठी लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन गंभीर प्रश्नांची व पूर परिस्थितीच्या मदतीसाठी शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन यावेळी दिले. 
      भेटी दरम्यान माजी राज्यमंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या समवेत बबलू भैय्या हकीम, जाफर सुफी, श्रीकांत मोडक, शाहीन भाभी हकीम, आसिफ सुफी, आदिवासी सेवक सबर बेग,  प्रफुल्ल बिश्वास,लक्ष्मी सडमेक, नगर सेवक शैलेश पटवर्धन आदी सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.


Top