logo

HOME   महाराष्ट्र

धर्मरावबाबा आत्राम यांनी दिली एटापल्ली येथील आंदोलनाला भेट

चौथ्या दिवशीही कडकडीत बंद

धर्मरावबाबा आत्राम यांनी दिली एटापल्ली येथील आंदोलनाला भेट


गडचिरोली:- एटापल्ली तालुका मुख्यालयात सुरू असलेल्या आंदोलनाला आज धर्मराव बाबा आत्राम यांनी भेट देऊन आपला पाठिंबा दर्शविला.
    विविध मागण्यांसाठी 16 ऑगस्ट पासून एटापल्ली तालुका अन्यायाविरुद्ध संघर्ष समितीने पूर्ण शहर बंद ठेवले आहे. या आंदोलनात विशेष म्हणजे विध्यार्थी सुद्धा सहभाग झाले असून येथील व्यापरवर्ग सुद्धा पाठिंबा देत असल्याने पूर्ण शहर कडकडीत बंद असल्याचे दिसून येत आहे.या उपोषणाच्या ठिकाणी आज माजी राज्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष धर्मरावबाबा आत्राम यांनी भेट देऊन उपोषणकर्त्यांची भेट घेऊन आस्थेने चर्चा केली,मागण्यांचे निवेदन हातात घेऊन वाचन केली आणि या मागण्यांना आपला पाठिंबा दर्शविला. एवढेच नव्हेतर तालुका मुख्यालयातील छोटेमोठे समस्या समस्या सोडविण्यासाठी येथील वीज वितरण विभाग आणि बीएसएनएल ऑफिस चे वरिष्ठ अधिकारी यांच्याशी चर्चा करून त्यांनी समस्या त्वरित निकाली काढण्याची मागणी केली एवढेच नव्हे तर येथील तहसील कार्यालय गाठून तहसीलदार यांच्याशी चर्चाही केली.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते बबलू हकीम, एटापल्ली पंचायत समितीचे सभापती बेबीताई नरोटी,राष्ट्रवादी काँग्रेसचे एटापल्ली तालुका अध्यक्ष दौलत दहागावकर,राजु गावडे,संभा हिचामी,राजू नरोटी,लक्षण नरोटी,प्रसाद नामेवार,मिथुन जोशी,दत्तात्रय राजकोंडावार आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
    एटापल्ली तालुका मुख्यालयात 16 ऑगस्ट पासून अन्याय विरोधी संघर्ष समिती तर्फे विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी बेमुदत आंदोलन सुरू केले असून यामध्ये एटापल्ली तालुक्यातील जारावंडी ला तालुक्याचा दर्जा द्यावा,वीजदर निम्मे करावे,बीएसएनएल सेवेचा दर्जा सुधारावा,जिल्हा परिषद हायस्कुल मध्ये विज्ञान महाविद्यालय सुरू करावे,एटापल्लीतील बंद झालेले मॉडेल स्कुल पूर्ववत सुरू करावे,अहेरी जिल्हा निर्माण करावा,स्वतंत्र विदर्भ निर्मितीचा प्रस्ताव शासनाने केंद्र शासनाकडे सादर करावा या व आदी मागण्यांचा समावेश असून या आंदोलनात सामान्य नागरिकांनी सुद्धा स्वयंस्फूर्तीने सहभाग घेतला आहे.
    आंदोलन नाचा आजचा हा चौथा दिवस असून मागण्या मंजूर न झाल्यास चक्काजाम आंदोलनाचा ईशारा सुद्धा या अन्यायाविरुद्ध संघर्ष समितीने दिला आहे.


Top