logo

HOME   महाराष्ट्र

वणी शहरात जम्मू-काश्मीरमधुन धारा 370 हटविण्याच्या ऐतिहासिल निर्णयाच्या समर्थनार्थ जल्लोष साजरा

नरेंद्र मोदी हे धाडसी नेतृत्व करणारे पंतप्रधान - रवी बेलूरकर

वणी शहरात जम्मू-काश्मीरमधुन धारा 370 हटविण्याच्या ऐतिहासिल निर्णयाच्या समर्थनार्थ  जल्लोष साजरा

सागर मुने,वणी : जम्मू काश्मीर मध्ये लागू असलेली कलम 370 अनुच्येद 35 अ रद्द करण्याचा धाडशी निर्णय घेतल्याबद्दल मोदी सरकारचे जल्लोषात अभिनंदन केले.श्रीराम नवमी जन्मोत्सव समिती व भाजपचे शहर अध्यक्ष रवी बेलूरकर यांनी येथील शिवाजी स्मारकाला  पुष्पमाला अर्पण करून भारत मातेचा जयघोष,  बँड व फटाक्यांची आतिषबाजी  मिठाई वाटून जल्लोष साजरा केला.  या वेळी रा.स्व.संघाचे जिल्हा सह कार्यवाह प्रशांत भालेराव, तालुका कार्यवाह अर्जुन उरकुडे, न.प वणी चे उपाध्यक्ष श्रीकांत पोटदुखे,बांधकाम सभापती राकेश बुग्गेवार, प्र.मुख्यधिकारी अरुन कावडकर,संतोष डंभारे नगरसेवक, संस्कार युवा मंचाचे सर्व पदाधिकारी व सर्व देशभक्त युवा वर्ग तसेच वणी शहरातील नागरिक मोठ्यासंख्येने उपस्थित होते.Top