सचिन पत्रकार- यवतमाळ येथील फैजनगर भागात राहणा-या अदनान अहमद याने नीट परिक्षेत ६१९ गुण मिळवले.त्याचे वडिल इनायतउल्ला खान प्राथमिक शाळे मध्ये शिक्षक आहे. मनोहर नाईक विज्ञान महाविद्यालय जि.अकोला येथे बारावीत त्याने ९० टक्के गुण मिळवले.दहावीत सीबीएससी मध्ये ही त्याने ९७ टक्के गुण मिळवले होते.देशातील गोरगरीब रुग्णांची सेवा करण्यासाठी आपण वैद्यकीय क्षेत्राची निवड केली असल्याचे अदनान म्हणाला.आपल्या यशाचे श्रेय तो शिक्षक आजोबा शफीउल्ला खान,आई निकहत अफरोज व वडील इनायतउल्ला खान यांना देतो.