logo

HOME   महाराष्ट्र

महिलेचा अश्लील व्हिडीओ बनविणारा ढोंगीबाबा गजाआड

महिलेचा अश्लील व्हिडीओ बनविणारा ढोंगीबाबा गजाआड भंडारा : मंत्रोपचाराने गर्भधारणा करून देण्याचे आमिष देऊन महिलेचा अश्लील व्हिडीओ तयार करून तिला ब्लॅकमेल करणाऱ्या ढोंगीबाबाला भंडारा पोलिसांनी बुधवारी सापळा रचून अटक केली. यादवराव सोमा मोहतुरे (रा. आंबेडकर वॉर्ड), असे आरोपी ढोंगीबाबाचे नाव आहे. कारवाईदरम्यान आरोपीची पत्नी व मुलगा फरार झाले.
ढोंगीबाबा यादवराव मोहतुरे याने तक्रारकर्त्या पीड‌ित महिलेला मंत्रोपचाराच्या माध्यमातून गर्भधारणा करून देण्याचे आमिष दिले होते. त्यानुसार पीडित महिलेने मोहतुरेशी संपर्क केला. मोहतुरे याने पीडित महिलेला आपल्या घरी वारंवार बोलावून मंत्रोपचाराचे नाटक करीत तिला बेशुद्धीचे औषध दिले. त्यानंतर तिचे अश्लील व्हिडीओ तयार करून व फोटो काढले. त्यानंतर तो पीडित महिलेला पैशाची मागणी करीत तिचे अश्लिल व्हिडीओ दाखवून ब्लॅकमेल करीत होता. पैसे न दिल्यास तिचे व्हिड‌िओ व्हायरल करण्याची धमकी दिली.
दोन दिवसांपूर्वी नागपूर येथील महिला सामाजिक कार्यकर्त्यासोबत पीडित महिलेने पोलिस अधीक्षक विनिता साहू यांची भेट घेऊन त्यांना हकिकत सांगितली. साहू यांनी तत्काळ भंडारा ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुरेश ढोबळे यांना कारवाई करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार ढोबळे यांनी सापळा रचून बुधवारी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या महिला कार्यकर्त्याला मोहतुरे या ढोंगीबाबाकडे उपचारासाठी पाठविले. तिने आपल्या पोटात त्रास होत असल्याचे मोहतुरे याला सांगितले. मोहतुरे याने मंत्रोपचाराचे नाटक सुरू केले. तेव्हा पोलिसांनी तत्काळ त्याला अटक केली. या कारवाईदरम्यान मोहतुरे याची पत्नी व मुलगा फरार झाले.


Top