logo

HOME   महाराष्ट्र

संताजी सेनेच्या वतीने भव्य संताजी महाराज जयंती मिरवणूक

संताजी सेनेच्या वतीने भव्य संताजी महाराज जयंती मिरवणूक

अकोट  कुशल भगत अकोला: संताजी सेना अकोला जिल्ह्याच्या वतीने तेली समाजाचे आराध्य दैवत व संत तुकाराम महाराजांनी विशद केलेली तुकारामगाथा ज्यांनी लेखणीबद्ध केली .ते मुळ तुकाराम गाथेचे लेखनिक श्री संताजी महाराज जगनाडे यांच्या जयंतीनिमित्त अकोला शहरात भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. या शोभायात्रेत सर्व तेली समाज बांधव माता भगिनी उपस्थित होते .मिरवणुकीमध्ये सुंदर सजवलेले उंट, घोडे संताजी महाराजांचा आकर्षक रथ विविध पौराणिक देखावे यासह भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवणारे देखावे सादर करण्यात आले होते. जिल्ह्यातील ग्रामीण भागातून समाज भगिनींच्या दिंड्या, वारकरी मंडळ मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. शोभायात्रेची सुरवात राठोड पंचबंगला शिवाजीनगर येथून संताजी महाराजांच्या रथ पूजनाने करण्यात आली . टाळमृदुगाच्या गजरात शोभायात्रा राजराजेश्वर मंदिर, जयहिंद चौक, गांधी रोड मार्गे स्वराज्य भवन येथे आलेल्या मिरवणुकीचे रूपांतर सभेत करण्यात आले.मिरवणूक मार्गात विविध विविध राजकीय पक्ष,संघटना,सेवाभावी संस्था यांनी संताजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करून शोभयात्रेचे स्वागत केले. मिरवणूक मार्गावर कुठेही कचरा होऊ नये याउद्देशाने स्वछता पथकही कार्यरत करण्यात आले होते.स्वराज्य भवन प्रांगणात आयोजित सभेला संताजी सेनेचे मार्गदर्शक तथा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बालमुकुंद भिरड, प्रसिद्ध उद्योजक अरविंद देठे, डवले कॉलेजचे प्रा प्रकाश डवले यांनी समाजात राष्ट्रनिर्मिती साठी सकारात्मक सहभाग नोंदवण्याचे व माहिती तंत्रज्ञानाच्या  युगात स्पर्धेत टिकून राहन्याकरिता जिद्द व चिकाटीचे महत्व आपल्या विचारातून प्रकट केले.यावेळी तेली समाजातील शिक्षण कला क्रीडा पत्रकारिता राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या नगरसेवक नितीन झापर्डे, क्रीडापटू स्वेता भिरड, नूतन झापर्डे, पत्रकार विशाल बोरे, हर्षदा सोनोने, चिरंजीवी ढवळे यांचा सन्मान करण्यात आला.यावेळी व्यासपीठावर जेष्ठ मार्गदर्शक सुधाकर झापर्डे, महादेवराव राठोड, रमेश गोतमारे,ललित भगत, उमेश सापधारे, किशोर वानखडे, गोपाल राऊत,अॅड आनंद गोदे, मदन भिरड, वामनराव थोटांगे, रामेश्वर वानखडे, गजानन नालट,डॉ योगेश साहूसह अनेक मान्यवर उपस्थित होते.संताजी महाराजांची मिरवणूक यशस्वी करण्याकरिता संताजी सेना अध्यक्ष प्रमोद देडवे,जिल्हा संपर्क प्रमुख योगेश गोतमारे यांच्या मार्गदर्शनात मनोज जुमळे, विश्वनाथ भागवत, विधी आघाडी अध्यक्ष अॅड  देवशीष काकड,जीतेश नालट,श्रेयश भिरड, सचिन थोटांगे,प्रतीक देडवे, राहुल धनभर, शुभम धनभर अॅड सागर डवले, अॅड प्रवीण जामोदे, निशांत राठोड, कैलास दळवी, गोपाल झापर्डे , मंगेश चोपड़े, सुनील वासनकर, शाम मनसुटे, सुमित सोनोने, शुभम राजुरकर, विशाल असलमोल, पवन निवाने, आशीष बोबडे,जितेंद्र सोनटक्के, शाम सोनटक्के,शंकर माहोरे, गणेश पोलाखडे .महिला आघाडीच्या अध्यक्षा किरण बोराखडे, सुमन ईचे कल्पना तायडे, पुष्पां गोतमारे, अनिता ढवले, अनिता भिरड,मंदाताई वासनकर, पुष्पा बोबडे यांच्यासह अनेकांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा अमर भागवत,तर आभार प्रदर्शन अॅड देवाशिष काकड यांनी केले..Top