logo

HOME   महाराष्ट्र

पूर्णा मायच्या स्वच्छतेसाठी सरसावली तरुणाई : स्वयंस्फूर्तीने राबविले स्वच्छपूर्णा अभियान.

पूर्णा मायच्या स्वच्छतेसाठी सरसावली तरुणाई :  स्वयंस्फूर्तीने राबविले स्वच्छपूर्णा अभियान.

अमरावती:-गणेशोत्सवा नंतर अतिशय अस्वच्छ झालेल्या पूर्णा नदीच्या स्वच्छतेसाठी रविवारि चोहोटा , करतवाडी रेल्वे ,व धामना येथील तरुणांनी पुढाकार घेत स्वच्छ पूर्णा अभियान राबवल..सालाबादप्रमाणे यंदाही गणेशोत्सव मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरनात साजरा झाला व विसर्जनही ...परंतु त्यानंतर गांधीग्राम येथील पूर्णा नदीची अवस्था ही न पाहण्यासारखीच होती...यामुळे नदी पात्र आणि त्यातील पाणी पूर्णतः अशुध्द झालं होतं..ही बाब सामाजिक कार्य करणाऱ्या तरुण वर्गाला न पटणारीच होती.त्यासाठी चोहोटा बाजार , करतवाडी रेल्वे , धामणा , येथील तरुणांनी माणुसकीच दर्शन देत रविवारचा पूर्ण दिवस तापत्या उन्हात श्रमदान करीत पूर्णा नदीच्या स्वच्छतेसाठी घालवला.यावेळी दहीहंड्याचे ठाणेदार प्रदीप देशमुख , गांधीग्रामचे सरपंच आनंदराव कठोळे यांनी भेट दिली.या उपक्रमात गणेश मेनकार करतवाडीचे सरपंच सुदर्शन किरडे , दशरथ वडाळ , योगेश किरडे ,अमोल राने, अमित बुंदे, शाम वडाळ ,भुषण वडाळ, हरिओम काकडे ,शिवदास वडाळ, शुभम वडाळ ,गणेश आढे, पवन मोरे ,बलवंत काकडे, नितिन बद्रे ,कुलदिप मानकर, देवानंद बुंदे , प्रज्वल बुंदे , सुयोग बुंदे ,सुयोग वडाळ ,आदेश वडाळ, रामा लांडे ,अविनाश बुंदे, प्रनव वडाळ ,जय वडाळ , पवन वर्मा आदींनी परिश्रम घेतले.



Top