logo

HOME   महाराष्ट्र

भांडगाव ते भाळवणी रस्त्यावरील श्रमदानातुन खड्डे बुजविले

गेल्या अनेक वर्षापासून भाळवणी ते भांडगाव रस्त्याची दैनिय अवस्था

 भांडगाव ते भाळवणी रस्त्यावरील श्रमदानातुन खड्डे बुजविले
पारनेर : तालुक्यातील भांडगाव ते भाळवणी हा रस्ता अत्यंत खराब झाला आहे खड्यात रस्ता की रस्त्यावर खड्डा हेच कळत नाही गेली अनेक वर्षापासून या रस्त्याचे काम अपुर्ण आहे गावातील ग्रामस्थांनी अनेक वेळा लोकप्रतिनिधी कडे या रस्त्याची मागणी केली निवेदन दिली परंतु या रस्ता कडे कोणत्याही राजकीय नेते व शासकीय अधिकारी यांची नजर गेली नाही यामुळे हा रस्ता डांबरीकरण होईल हे स्वप्न ग्रामस्थांचे स्वप्नच राहिले माञ गावातील युवकांनी पुढाकार घेऊन लोकवर्गणी गोळा केली रविवारी 22सप्टेंबर रोजी गावातील सर्व ग्रामस्थांनि श्रमदान करण्यासाठी उपस्थित रहाण्याचे आव्हान करण्यात आले या आव्हानांला ग्रामस्थांनी उत्फुर्तेपणे प्रतिसाद दिला गावातील महिला पुरुष तरूण वर्ग यांनी दैनंदिन काम बंद ठेवत या रस्ता वरील साईड पट्या , काटेरी झुडपे , खड्डे यामध्ये मातीची भर टाकुन रस्ता तयार करण्यात आला हा रस्ता अनेक गावांसाठी दळणवळणासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे.आता तरी या रस्त्याची शासन दरबारी दखल घेतली जाणार का असा प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.


Top