logo

HOME   महाराष्ट्र

मल्टिफ्लेक्सवाल्याना सरकारच्या निर्णयाची प्रत देऊन त्यांची मुजोरी बंद करा

मनसेचे जिल्हाधिकाऱ्यांना आवाहन

मल्टिफ्लेक्सवाल्याना सरकारच्या निर्णयाची प्रत देऊन त्यांची मुजोरी बंद करा

मल्टिफ्लेक्स च्या आवारात 5 पट दराने खाद्य पदार्थ विकल्या जात असल्यामुळे मनसे ने चित्रपटप्रेमी जनतेची लूट लक्षात घेऊन आंदोलन केले होते त्या आंदोलनाला मिळालेला प्रतिसाद लक्षात घेऊन सरकारने पावसाळी अधिवेशनात याबाबत निर्णय घेतला त्यानुसार खाद्यपदार्थाचे दर कमी करण्यात यावे व बाहेरील खाद्यपदार्थ आणण्याची मुभा दिली व 1 आगस्ट पासून या निर्णयाची अंमलबजावणी होईल असे घोषित केले मात्र मल्टिफ्लेक्स प्रशासनाने सरकार निर्णयाची प्रत मिळाली नसल्याचे कारण सांगून आपली मुजोरी कायम ठेवली यामुळे मनसे ने जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांना प्रत्यक्ष भेटून सरकारच्या निर्णयाची प्रत मल्टिफ्लेक्सवाल्याना देऊन त्यांची मुजोरी बंद करावी व ग्राहकांची लूट थांबवावी अश्या आशयाचे निवेदन देऊन विस्तृत चर्चा केली याबाबत त्वरित दखल घेऊ असे जिल्हाधिकारी श्री मुदगल यांनी मनसे च्या शिष्टमंडळास सांगितले निवेदनाची प्रत पालकमंत्री बावनकुळे यांनाही देण्यात आली शिष्टमंडळात मनसेचे प्रदेश सरचिटणीस हेमंत गडकरी, नागपूर शहर अध्यक्ष अजय ढोके व विशाल बडगे,उपशहर अद्यक्ष प्रशांत निकम व रजनीकांत जिचकार, शहर सचिव श्याम पुनियानी व घनश्याम निखाडे,विभाग अध्यक्ष चंदू लाडे, ( पश्चिम)शशांक गिरडे (मध्य) अंकुश भेलकर(दक्षिण-पश्चिम)कपिल आवारे(पूर्व) ऍड रणजित सारडे, इकबाल रिझवी,सुमित वानखेडे,सुधीर बोरेकर, अभय व्यवहारे, विपीन लाडे यांचा समावेश होता.Top