logo

HOME   महाराष्ट्र

मालेगावात योग शिबिर सतत सुरू करण्यासाठी प्रयत्न करू - श्याम बाबू मु़ंदडा

मालेगावात योग शिबिर सतत सुरू करण्यासाठी प्रयत्न करू - श्याम बाबू मु़ंदडा मालेगाव : येथे चतुर्थ आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त नाना मुंदडा महाविद्यालयांमध्ये पतंजली योग समिती मालेगाव यांच्या वतीने भव्य योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.उद्योगपती श्याम बाबू मुंदडा प्रदेश भाजपा सदस्य गोपाल पाटील राऊत प्रशिक्षक किसान पंचायत चे जिल्हा प्रभारी शंकर भाऊ ठाकरे डॉक्टर संतोष जाधव मुख्याध्यापक वसंतराव आवचार ओमप्रकाश गटानी तालुका प्रभारी यशवंत जावळे तहसील महिला प्रमुख अर्चना मंत्री यांच्या हस्ते सकाळी सहा वाजता शिबिराचे दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली
प्रास्ताविकातून गोपाल पाटील राऊत यांनी आदरणीय नरेंद्र मोदी व योगगुरू बाबा रामदेव यांच्या संकल्पनेतून 117 देशात योगा ला मान्यता मिळाली असून 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा करण्यात येतो त्याअनुषंगाने आज मालेगाव मध्ये योग शिबिर होत असून योग प्रशिक्षक शंकर ठाकरे आपल्याला योगाचे धडे देणार,आहेत आहार-विहार योग हे तीन तत्त्वे प्रत्येक व्यक्तीने अंगीकारल्यास माणसाच्या जवळ कुठल्या प्रकारची बिमारी येणारच नाही याची संकल्पना बाबा रामदेव यांनी दिली
नंतर योगशिक्षक शंकराव ठाकरे यांनी योगाचे धडे देऊन प्रात्यक्षिक करून दाखविले यामध्ये कपाल भारती अनुलोम शीर्षासन वज्रासन मण्डुकासन हास्य आसन सिंहासन इतर आसने शिबिरार्थी कडून करून घेतले व आपल्या शरीराच्या प्रत्येक अवयवाला कोणता आहार व कोणता योग करावा लागतो याचे सविस्तरपणे मार्गदर्शन केले व पंतप्रधान नरेंद्र मोदी योगगुरू बाबा रामदेव यांची संकल्पना योग्य प्रशिक्षकाने शिबिरार्थींना समजावून सांगितले या योग शिबिराला तहसीलदार राजेश वजीरे गटविकास अधिकारी संदीप कोतकर माजी आमदार किसनरा़ गवळी बन्सीलाल व्यास डॉक्टर विजय सोनवणे आर्ट ऑफ लिव्हिंगचे डॉक्टर संतोष जाधव जिल्हा संघचालक गोविंद पुरोहित शंकरराव ढोबळे श्रीराम रोडे नितीन पाटील काळे तेजस आरू किरण जिरवणकर गणेश तिवारी प्राध्यापक आनंद देवळे गजानन पाटील दिनेश उंटवाले योग समितीचे नामदेव बोरचाटे ग्रामीण बँकेचे शाखाधिकारी कुलकर्णी साहेब मधुकर भांडेकर यांच्यासह योग प्रेमी कर्मचारी व्यापारी शेतकरी महिला युवा वर्ग पत्रकार बांधव यांची असंख्य उपस्थिती होती सकाळी सहा वाजता सुरू झालेल्या शिबिराची सांगता आठ वाजता करण्यात आली समारोपीय कार्यक्रमात डॉक्टर संतोष जाधव गोपाल पाटील राऊत श्याम बाबू मुंदडा यांनी आपले मनोगत व्यक्त केले श्याम बाबू मुदडां यांनी मालेगाव शहरांमध्ये योग शाळा सतत सुरू करण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करणार असून आपणही सर्व शहरवासीयांनी सहकार्य करावे त्यासाठी शाळेची इमारत विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येईल असा आश्वासन बाबूजीं यांनी दिले कार्यक्रमाला दोनशेच्यावर योग प्रेमी उपस्थित होते आभार प्रदर्शन पतंजलि के तालुका प्रभारी यशवंत जावळे यांनी केले.


Top