logo

HOME   महाराष्ट्र

बहिष्कार प्रकरणी बसपाचे गुरुवारी एकदिवशीय धरणे आंदोलन

जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

बहिष्कार प्रकरणी बसपाचे गुरुवारी एकदिवशीय धरणे आंदोलन वाशीम - तालुक्यातील ग्राम शिरपुटी येथे दलित समाजावर झालेल्या बहिष्कार प्रकरणाचा निषेध म्हणून बहूजन समाज पार्टीच्या वतीने गुरुवार, 21 जुन रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विशाल एकदिवशीय धरणे आंदोलन करण्याचा इशारा बसपाचे प्रदेश सचिव अविनाश वानखेडे यांच्या नेतृत्वात 18 जुन रोजी जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या एका निवेदनाव्दारे देण्यात आला.

निवेदनात नमुद केले आहे की, तालुक्यातील ग्राम शिरपुटी येथील दलित समाजावर त्या गावातील उच्चवर्णीय लोकांनी सामुहिक बहिष्कार करुन त्यांना लोकशाहीने दिलेल्या अधिकारापासुन वंचित ठेवले आहे. सदर प्रकरणात बौध्द समाजाच्या 11 जणांवर कलम 392 व 395 अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सदर गुन्हे मागे घेण्यात यावे. तसेच दलित वर्गातील लोकांवर अन्याय करणार्‍या 69 सवर्ण आरोपींविरुध्द गुन्हे दाखल करुन त्यांना त्वरीत अटक करण्यात यावे. या मागणीसाठी व सदर घटनेचा तीव्र निषेध म्हणून गुरुवार, 21 जुन रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विशाल एकदिवशीय धरणे आंदोलन करण्याचा इशारा जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनाव्दारे अविनाश वानखेडे यांनी दिला आहे. निवेदनाच्या प्रती राज्याचे गृहमंत्री, पोलीस महानिरिक्षक, पालकमंत्री, जिल्हा पोलीस अधिक्षक, ठाणेदार आदींना देण्यात आल्या आहेत.


Top