logo

HOME   महाराष्ट्र

चतुर्थ अंतर्राष्ट्रीय योग दिवसाचे मालेगाव येथे आयोजन

उपस्थित राहण्याचे योग समिती मालेगाव यांचे आवाहन

चतुर्थ अंतर्राष्ट्रीय योग दिवसाचे मालेगाव येथे आयोजन वाशिम : दिनांक 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवसानिमित्त मातोश्री संकुल शेलू फाटा मालेगाव येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हा प्रभारी गजानन धर्माळे व प्रमुख उपस्थिती प्रदेश सदस्य गोपाल पाटील राऊत प्रांतीय सदस्य रामदाजी धनवे, सह राज्य प्रभारी शंकरजी नागपुरे ,किसान पंचायत चे शंकर ठाकरे, बाळू भाऊ काळे, जिल्हा कोषाध्यक्ष भगवंतराव वानखडे यांच्या प्रमुख उपस्थितीत सदर बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीमध्ये 21 जून रोजी मालेगाव येथे भव्य योग दिवस साजरा करण्यासाठी मालेगाव शहरातील व तालुक्यातील नागरिकांना व महिलांना जास्तीत जास्त उपस्थित राहण्यासाठी प्रसिद्धी व प्रचार करण्यासाठी व योग शिबिराला उपस्थित राहण्यासाठी सर्व नागरिकांना आव्हान करण्याचे ठरले यामध्ये युवा स्वालंबन आंतरराष्ट्रीय योग दिवस भव्य दिव्य प्रमाणात साजरा करण्यासाठी शहरातीलच ना ना मुंदडा विद्यालय मालेगाव येथे 21 जून रोजी सकाळी सहा ते आठ या वेळात भव्यदिव्य योग शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे यासाठी योग प्रशिक्षक म्हणून जिल्ह्यातून प्रशिक्षित शिक्षक येणार आहेत तसेच 20 जून रोजी सकाळी अकरा वाजता भव्य मोटरसायकल रॅली काढून शहरामध्ये जनजागृती करण्यात येणार आहे मालेगाव शहरात योग दिवस भव्यदिव्य प्रमाणात करण्यासाठी पतंजली योग समिती मालेगाव व सर्व समाजातील व सर्व राजकीय पदाधिकारी व्यापारी विविध संस्था चे पदाधिकारी कर्मचारी उद्योजक महिला व पत्रकार बांधव यांना उपस्थित राहण्यासाठी विनंती करण्यात यावी व प्रचार व प्रसिद्धी करण्यात यावी असे ठरवण्यात आले यामध्ये पतंजली योग समितीकडून विविध समाजोपयोगी योजना राबविण्यात येणार आहे याची माहिती गजानन धर्माळे यांनी दिली त्यामध्ये युवा स्वालंबन शिबीर निवासी पतंजली कॉल रोजगार निर्मिती 23 ते 27 जून वाशिम येथे होईल पतंजली मार्फत BSNL सिम कार्ड सुद्धा उपलब्ध होईल स्वदेशी समृद्धि कार्ड योजना सुद्धा कार्यांन्वित करण्यात येईल याबद्दल मार्गदर्शन शंकरजी नागपुरे यांनी केले यामध्ये अनेक मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले योग दिवस अतिशय उत्साहात व भव्य दिव्य प्रमाणात करण्याचे ठरवले त्यामध्ये प्रचार व प्रसार योग समिती मालेगाव यांनी करावा त्यासाठी सर्व समाजातील घटकांना सोबत घेऊन त्यांना आमंत्रित करावे असे ठरवण्यात आले या बैठकीला गोपाल पाटील राऊत यांनी सुद्धा मार्गदर्शन केले त्यांनी आपल्या भाषणात सांगितले की जास्तीत जास्त लोकांना या शिबिराचा लाभ घ्यावा आपल्या आरोग्याची काळजी करावी आहार-विहार योग ही तीन तत्त्वे माणसाने अंगीकारली तर माणसाला बिमारी येणारच नाही हे लक्षात ठेवले पाहिजे यावेळी तालुका प्रभारी यशवंतरावजी जावळे, दिनेश उंटवाले, नामदेव बोरचाटे, तेजस आरु ,विष्णू उगले, नितीन काळे, अनिल गवळी, सुनील राऊत, मंगेश गवळी, उमेश आंधळे, दिनेश नाकट सह असंख्य कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.


Top