logo

HOME   महाराष्ट्र

जमिनीवर राहून कार्य करणा-या प्रहार सैनिकांनी जाम ग्राम पंचायतीवर फडकविला झेंडा

विदर्भ संपर्क प्रमुख गजुभाऊ कुबडे यांच्या प्रयत्नाला यश

जमिनीवर राहून कार्य करणा-या प्रहार सैनिकांनी जाम ग्राम पंचायतीवर फडकविला झेंडा वर्धा : जिल्ह्यातील जाम तालुक्यात असलेल्या समुद्रपूर ग्रामपंचायतीत झालेल्या निवडणुकीमध्ये सरपंच पदासह सहा उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होऊन या ग्राम पंचायतीवर प्रहार जनशक्ती पक्षाचे विदर्भ संपर्क प्रमुख गजुभाऊ कुबडे यांच्या नेतृत्वात निवडणूक लढवून ग्राम पंचायतीवर प्रहारचा झेंडा फडकविला.

प्रहार जनशक्ती पक्षाचे नवनिर्वाचित सरपंच सचीन गावंडे व नवनिर्वाचित सदस्य अजय खेडेकर , सूरज शम्भरकर, सनि निवटे साधनाताई पुस्देकर! , नानाजी उरकांदे राहुल पाटिल चंदाताई खुडसन्गे
आदी उमेदवार मोठ्या फरकाने विजयी झाले यावेळी विदर्भ संपर्क प्रमुख गजुभाऊ कुबडे मित्रमंडळाच्या वतीने नवनिर्वाचित विजयी उमेदवाराचे करण्यात आले स्वागत करतांना प्रहार जनशक्ती पक्षाचे विदर्भ प्रमुख रुग्णमित्र- गजु कुबडे , वर्धा जिल्हाप्रमुख देवा धोटे, उपजिल्हाप्रमुख राजेश बोभाटे हिंगणघाट शहर प्रमुख अजय लढी व ईतर तालुक्यातील पदाधीकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करतांनी विदर्भ संपर्क प्रमुख यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना असे संबोधित केले की , पक्ष कार्यकर्त्यांनी मा.आ.बच्चुभाऊंचा आदर्श घेऊन आपले कार्य अखंडीतपणे चालू ठेवले पाहिजे यश वा विजय एक दिवस आपल्याकडे चालत येईल , कार्यकर्त्त्यांनी हवेत न उडता जमिनीवर राहून रुग्णसेवा व जनतेची सेवा केली पाहिजे हेच आपले भांडवल आहे आणि याच्याच बळावर आपण जनतेसमोर जाऊन विजय संपादन करु शकतो त्याचेच उत्तम उदाहरण म्हणजे समुद्रपूर ग्राम पंचायतची निवडणूक आहे.

मी नेहमीच मा.आ.बच्चुभाऊंनी घालवून दिलेल्या आदर्शावरच रुग्णसेवा करत आहे माझ्या डोक्यात कधीच राजकरण शिरू देत नाही फक्त आणि फक्त रुग्णसेवा करत जनसेवा चालू आहे व करत राहणार आहे याचे अनुकरण प्रत्येक कार्यकर्त्यांनी करावे असेही आवाहन यावेळी केले.


Top