logo

HOME   महाराष्ट्र

गजानन महाराज पालखीच्या अश्वाने घेतला अखेरचा श्वास

गजानन महाराज पालखीच्या अश्वाने घेतला अखेरचा श्वास
शेगाव : कातपूर ते शेगाव या पायी जाणाऱ्या गजानन महाराज पालखीचा १४ वर्षांपासून भार वाहणाऱ्या रामा अश्वाने सोमवारी सकाळी अखेरचा श्वास घेतला.मुंबई रेसकोर्सच्या घोड्यांची आरोग्य तपासणी करणाऱ्या डॉ. काद्री व तारुपिंपळवाडी येथील डॉ. गव्हाणे यांनी शर्थीचे प्रयत्न करूनही या घोड्याचे प्राण वाचू शकले नाही.पिंपळवाडी येथील सागर तुळशे या युवकाचा हा घोडा होता. तसेच गजानन महाराज अध्यात्मिक परिवाराचा एक सदस्य होता. २१ मे रोजी जन्मलेला हा घोडा चौदा महिन्यांचा असताना संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या गावातील प्रकाश औटे यांच्याकडून घेतला होता. जन्मदिनीच या घोड्याचा मृत्यू झाला. या घोड्याचे अंत्यसंस्कार भक्तीभावाने, श्रद्धेने पिंपळवाडी येथे करण्यात आले. गजानन महाराज भक्तांनी या ठिकाणी समाधी बांधण्याचा संकल्प केला आहे.हा घोडा खास केवळ पालखी, मदार की चादर अशा धार्मिक विधीसाठी राखीव असायचा. शांतिब्रह्म संत एकनाथ महाराज यांच्या पालखी सोहळ्यात नाथपादुका आपल्या पाठीवर वाहून नेत असे. या घोड्याच्या अंत्यसंस्कारावेळी ह.भ.प.रामचंद्र महाराज चिंचोलकर, विजय चव्हाण, शरदराव खुरपे, विश्वनाथ धोंगडे, नटराज बँडबाजाचे संचालक उत्तमराव घोडके, नारायण ससाणे, विनायक मोकाशे, लखा आहुजा, बाळू आढाव, विठ्ठल केसकर, तसेच मुस्लिम समाजातील नागरिक व गजानन महाराज भक्तांसह पिंपळवाडी, कातपूर, मुधलवाडी, जायकवाडी, संभाजीनगर, पैठण येथील नागरिकांची उपस्थिती होती.


Top