logo

HOME   महाराष्ट्र

दोघींना गर्भधारणा,मुर्री शाळेत शिक्षकाने केला विनयभंग

दोघींना गर्भधारणा,मुर्री शाळेत शिक्षकाने केला विनयभंग

गोंदिया :- माणुसकीच्या नावाला काळे फासण्याच्या तीन घटना रविवारी (ता.११) वेगवेगळय़ा ठिकाणी उघडकीस आल्या. प्रेमाचे आमिष दाखवून सोशल मिडियावर बदनाम करण्याची धमकी देवून शारीरिक संबंध ठेवल्यावर दोन अल्पवयीन मुलींना गर्भधारणा झाल्याची, तर एक ठिकाणी शाळेतच शिक्षकाने विद्यार्थिनीसोबत घृणास्पद काम केल्याची घटना घडली. सदर शिक्षकाला निलबिंत करण्यात आले असून शिक्षण सभापती रमेश अंबुले यांनी शाळेला भेट देत शाळेचे मुख्याध्यापक व इतरावरही कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.
पहिल्या घटनेत, आमगाव येथील निलेश बहेकार (२३) याने सालेकसा तालुक्यातील कालीमाटी येथील १७ वर्षीय मुलीला प्रेम असल्याचे भासवून तिचे मोबाईलव्दारे काही आक्षेपार्ह फोटो काढले. दरम्यान, हे फोटो सोशल मिडियावर सार्वजनिक करण्याची धमकी देवून २८ मे २0१७ रोजी गोंदिया येथील एका लॉजमध्ये तिच्याशी शारीरिक संबंध निर्माण केले. यातून तिला गर्भधारणा झाली. ही बाब तब्बल आठ महिन्यानंतर तिच्या घरच्यांच्या लक्षात आली. यासंदर्भात सालेकसा पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला असला तरी, पीडित युवतीचे आयुष्य उद्धस्त झाले आहे.
दुसर्‍या घटनेत, सोशल मिडियाच्या माध्यमातून मैत्रीण झालेल्या १५ वर्षीय युवतीशी जबरीने शारीरिक संबंध ठेवल्याने तिला गर्भधारणा झाल्याची घटना तिरोडा तालुक्यातील खुरखुडी येथे घडली. खुरखुडी येथील १५ वर्षीय पीडित मुलीची सोशल मिडियाच्या माध्यमातून नागपूरच्या बागउमरी येथील २२ वर्षीय आरोपीशी एक वर्षापूर्वी मैत्री झाली. दरम्यान, या कालावधीत आरोपीने खुरखुडी येथे येवून तिला आमिष दाखवून शारीरिक संबंध निर्माण केले. यातून ती गर्भवती झाल्याने तिने लग्नासाठी तगादा लावला असता आरोपीने लग्नास नकार देवून ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी तिरोडा पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे.
तिसर्‍या घटनेत, र्मुी येथील जिल्हा परिषद शाळेत सात मार्च रोजी घडली. पीडित सात वर्षीय मुलगी ही शाळेत असताना मध्यान्ह भोजन वेळेत आरोपी शिक्षक लक्ष्मीचंद हरिणखेडे याने तिला एका खोलीत नेले व तिचे कपडे काढून शारिरीक चाळे केले. दरम्यान मुलीने घटलेली घटना घरी सांगितली. मुलीच्या आईच्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे.


Top