logo

HOME   महाराष्ट्र

धारणी येथे आदिवासी बांधवांसाठी शिबिराचे आयोजन

खासदार आनंदराव अडसूळ यांचे हस्ते उदघाटन

धारणी येथे आदिवासी बांधवांसाठी शिबिराचे आयोजन
अमरावती :- लोकसभा मतदार संघातील अती दुर्गम मेळघाट क्षेत्रातील तालुक्याचे ठिकाण असलेल्या धारनी येथे महाराजस्व अभियान अंतर्गत स्थानिक आदिवासी बांधवांचे समाधान व महाआरोग्य शिबिराचे उदघाटन अमरावती लोकसभा मतदार संघाचे खासदार आनंदराव अडसूळ यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी पंतप्रधान उज्वला योजना अंतर्गत भगिनींना गॅस सिलिंडर चे वाटप करण्यात आले तथा विविध शासकीय योजना अंतर्गत धनादेश व ट्रॅक्टर वितरित करण्यात आले.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री ना.प्रवीण पोटे पाटील,आ. प्रभुदास भीलावेकर, नगराध्यक्षा रजियाबी शेख,प.स.सभापती रोहित पटेल,जी.प.सदस्य सौ.सीमाताई घाडगे,शिवसेना तालुकाप्रमुख शैलेश मालवीय,भाजपा तालुकाप्रमुख अप्पा पाटील व मोठ्या संख्येने शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते तथा स्थानिक नागरिक उपस्थित होते.


Top