logo

HOME   महाराष्ट्र

घरकाम करणाऱ्या महिलेवर अत्याचार

गोपाल चौधरी विरुद्ध गुन्हा दाखल

घरकाम करणाऱ्या महिलेवर अत्याचार

बुलढाणा - घरकामावर असलेल्या महिलेवर शारिरीक अत्याचार केल्याच्या आरोपाखाली रविवारी खामगाव शहर पोलिसांनी येथील चौधरी वाइन शॉपचा संचालक गोपाल चौधरी या ५१ वर्षीय इस्मा विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखलकेला आहे. खामगाव शहरातील ३२ वर्षीय महिला वाइन शॉपचा संचालक गोपाल चौधरी यांच्या कडे घरकामाकरिता येत होती. शहरातील बारदारी भागात गोपाल चौधरी यांचे घर व कार्यालय असून तेथे ही महिला साफसफाईचे काम करत होती. दरम्यान आरोपी गोपाल चौधरी याने धमकी देवून आपल्यावर अत्याचार केला आणि कुणाला काही माहिती दिली तर जीवे मारण्याची धमकी दिली, असा आरोप करत महिलेने रविवारी खामगाव शहर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. दरम्यान महिलेला ५ महिन्याची गर्भधारणा झाल्याचे समजते. तक्रारीवरून पोलिसांनी गोपाल चौधरी विरोधात गुन्हा दाखल केला असून तपास ठाणेदार उत्तम जाधव करीत आहेत.


Top