logo

HOME   महाराष्ट्र

दुर्मीळ दुतोंड्या मालवन तस्करांना अटक, चौघांना अटक।

अडीच कोटीचा ठरला होता सौदा

दुर्मीळ दुतोंड्या मालवन तस्करांना  अटक, चौघांना अटक। दर्यापूर - दुर्मीळ समजल्या जाणा-या दुतोंड्या सापाची तस्करी करताना चौघांना दर्यापूरनजीक शनिवारी अटक करण्यात आली. ही कारवाई मुंबई वाइल्ड लाइफ क्राइम कंट्रोल ब्युरो, मेळघाट वाइल्ड लाइफ क्राइम सेल व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने केली.

अब्दुल हनिफ अब्दुल हबीब (३६), गौर शाह कादर शाह (४६), अफजल हुसेन अली रियाज अली ऊर्फ चाचा (५९ तिघेही रा. अकोट फैल, अकोला) व तस्लीम शाह तुकमान शाह (३५, रा. चोहोट्टा बाजार, जि. अकोला) यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याजवळून साडेचार किलो वजनाचा दुतोंड्या साप व तीन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात या सापाची किंमत पाच कोटी असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. आरोपींनी या सापाचा सौदा अडीच कोटी रुपयांत केला होता.


Top