logo

HOME   महाराष्ट्र

33वषिँय युवकाचा मारहाणीत मुत्यू.

आई, वडील, मेव्हणा व पत्नी यांनी केली होती जबर मारहाण. पत्नीच्या चारीत्र्यावर संशय घेतल्याने झाला होता वाद.

33वषिँय युवकाचा मारहाणीत मुत्यू.   बुलढाणा:----बुलढाणा जिल्ह्यातील लोणार
तालुक्यातील पिंपळनेर येथील घटनेत एका 33वषीँय युवकाचा मुत्यु झाल्याची घटना घडली.सदर युवकाने
पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेतला म्हणून जन्मदात्या आई, वडील, मेव्हणा व पत्नी ने मारहाण केल्याने पिंपळनेर येथे विनोद हिम्मत सानप वय ३३ याचा मारहाणीत मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

या बाबत सविस्तर वृत्त असे कि, पिंपळनेर येथील मृतक विनोद सानप याचा पत्नीवर चारित्र्याच्या संशयावरून वाद झाला. या वादाचे रुपांतर भांडणात झाले. यावेळी मृतकाची आई, वडील, मेव्हणा व पत्नी यांनी मृतक विनोद यांच्या डोक्यावर व डोक्याच्या पाठीमागे, छाती पोटावर जबर मारहाण करून जखमी केले .

त्याला कुटुंबातील काही सदस्याने ग्रामीण रुग्णालय लोणार येथे उपचारासाठी आणले असता वैदकीय अधिकारी प्रवीण गवई यांनी जखमी विनोद सानप यास मृत घोषित केले.
या बाबत पिंपळनेर येथील पोलीस पाटील इंद्रजीत पिराजी चव्हाण यांनी लोणार पोलीस स्टेशन ला फिर्याद दिली असता मेहकर उपविभागीय अधिकारी, रामेश्वर वैजने तथा लोणार पोलीस स्टेशन चे प्रभारी ठाणेदार आत्माराम प्रधान यांनी ग्रामीण रुग्णालयात भेट देत मृतकाची शवविच्छेदन प्रक्रिया पार पाडत पोलीस अधिकाऱ्यांना तपासाबाबत आवश्यक सूचना दिल्या त्यावरून लोणार पोलीस स्टेशन ला अ.प. क्र. ५४/१८ कलम ३०२,३४ भांद्वी नुसार गुन्हा दाखल करत आरोपी मृतकाची आई कमाल हिम्मत सानप, वडील हिम्मत जिजाजी सानप, बबन विनायक गीते व मृतकाची पत्नी रंजना विनोद सानप यांना ताब्यात घेतले असून पुढील तपास प्रभारी ठाणेदार आत्माराम प्रधान यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर थोरात करीत असून या आरोपीच्या तपासकामी पोलीस उपनिरीक्षक उकंडराव राठोड, पो.कॉ. राम गीते, पो.कॉ. सुरेश शिंगणे, पोलीस चालक गजानन ठाकरे यांनी मोलाचे सहकार्य केले आहे


Top