logo

HOME   महाराष्ट्र

पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रमोद गुडधे युवा पुरस्काराने सन्मानित

- समाजाच्या विविध क्षेत्रातील कार्याची दखल

पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रमोद गुडधे युवा पुरस्काराने सन्मानित
गोंदिया : समाजातील विविध क्षेत्रातील घटक, विद्यार्थी, युवक तसेच नक्षलबहुल भागातील आदिवासी युवकांमध्ये स्वंयरोजगार, क्रीडा व सांस्कृतिक कौशल्याची पायाभरणी व्हावी, याकरिता विविध मंचावरून सातत्याने कार्यरत युवा सामाजिक कार्यकर्ते प्रमोद गुडधे यांच्या कार्याची दखल राज्य शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयाअंतर्गत गोंदिया जिल्हा क्रीडा कार्यालयाने घेतली आहे़ २६ जानेवारी अर्थात गणराज्य दिनानिमित्त आयोजित खास कार्यक्रमात त्यांना बहुमानाचा जिल्हा युवा पुरस्कार राज्याचे समाजकल्याणमंत्री व पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते देण्यात आला़ गुडधे यांनी सहपत्नीक तो पुरस्कार स्वीकारला़

यावेळी जिल्हाधिकारी डॉ़ अभिमन्यू काळे, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ़ दिलीप पाटील भूजबळ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ़ राजा दयानिधी, जिल्हा क्रीडा अधिकारी सुभाष गांगरेड्डीवार व इतर महत्त्वपूर्ण अधिकारी, पदाधिकाºयांची उपस्थिती होती़ दहा हजार रुपये रोख, गौरवपत्र आणि सन्मानचिन्ह, असे या पुरस्काराचे स्वरूप आहे़ या पुरस्कारानंतर गुडधे म्हणाले, सर्वांचे सहकार्य आणि निस्सिम प्रेमामुळे ही सामाजिक वाटचाल यशस्वी झाली़ सामाजिक सुधारणेचा अधिक महत्त्वपूर्ण टप्पा गाठायचा आहे़ त्यासाठी उत्तरदायीत्व म्हणून आपल्या सर्वांचे बळ पुढे आवश्यक आहे़.गुडधे यांनी आपल्या यशाचे श्रेय आई बाबा, पत्नी व सम्पूर्ण परिवाराला दिले.
प्रमोद गुडधे यांचे आमदार डॉ.परिणय फुके,विधान परिषद गोंदिया-भंडारा , डॉ.रवी धकाते, जिल्हा शल्यचिकित्सक भंडारा,श्री.विनोद अग्रवाल, सदस्य महाराष्ट्र कार्यकारणी भाजपा, श्री.विवेक खडसे, जिल्हा माहिती अधिकारी, श्री.वीरेंद्र अंजनकर, जिल्हा महामंत्री भाजप , श्री.सुनील सोसे, जिल्हा समन्वयक माविम, मुकेश शिवहरे जिल्हा प्रमुख शिवसेना, श्री.प्रेमदास नौकरकर, विभागीय व्यवस्थापक एफडीसीएम , डॉ.घनश्याम तूरकर , डॉ.सविता बेदरकार.श्री.कालूराम अग्रवाल , डॉ .माणिक गेडाम यांनी अभिनंदन केले .

- डॉ़ रवी धकाते, जिल्हा शल्य चिकित्सक, भंडारा़

समाजातील विविध क्षेत्रातील शेवटच्या घटकांपर्यंत शासनाचा संदेश पोहोचण्याचे फार मोठे काम गुडदे यांच्यामार्फत होत आहे़ हे कार्य अप्रत्यक्ष असले तरी ते दखलपात्र आहे़ त्यांच्या प्रत्येक कार्याला माझ्या शतश: शुभेच्छा आहे़

- डॉ़ परिणय फुके, आमदार, गोंदिया-भंडारा

सर्वांना आपलेसे करून कुठल्याही उपक्रमाला सर्वकषपद्धतीने समाजात पोहोचविण्याचे कसब गुडदे यांच्यात ठासून भरले आहे़ सामाजिक प्रश्नांची जाणीव व ते पोटतिडकीने सोडविण्याचे फार मोठे आव्हान त्यांनी स्वीकारले आहे़ त्यांची पुरस्काररूपी ही दखल नक्कीच अभिनंदनीय व शुभेच्छास पात्र आहे़


Top